WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result link दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बोर्डाचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC result link आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे नेमक्या कोणता हा निर्णय आहे आणि बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी काय आनंदाची बातमी आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SSC HSC result link संपूर्ण माहिती

राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संपल्या आता विद्यार्थी पालक आता बोर्डाच्या परीक्षेकडे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत तर आता तुम्हाला माहिती आहे का बोर्डाचा पॅटर्न देखील बदलणार आहे आणि बोर्ड विद्यार्थ्यांचे एक महत्त्वाचे मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे त्याचप्रमाणे बोर्डाचा निकाल कशा पद्धतीने लागणार त्याची पण माहिती आपण पाहणार आहोत आता यावर्षी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्यावर त्याचे एकमेव कारण म्हणजे बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकर लावून पुढील प्रवेश प्रक्रियेत उशीर न होणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून निकाल आणि परीक्षा लवकर घेण्यात येणार होते अशा प्रकारे बोर्डाने आधीच सांगितलं होतं आता बोर्डाणी आणखीन एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

SSC HSC result link जिल्हा परिषदांच्या शाळांसह मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सीबीएसई व सेमी इंग्रजीकडे पालक-विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा- प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले जाणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेकडून त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार केला जात आहे. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होऊन परीक्षा काळातील त्यांची घोकंपट्टी थांबेल, अशा प्रश्नपत्रिका असणार आहेत.

केंद्र व राज्य मंडळाच्या माध्यमातून ‘यशदा’कडून बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या विषयतज्ज्ञांचे (पेपर सेटिंग करणारे शिक्षक) नुकतेच प्रशिक्षण पार पडले आहे. सध्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनदा शाळा स्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा (चाचण्या) होतात. त्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढल्या जातात, मूल्यमापनही शाळाच करतात. त्यात पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची ढकलपास पद्धत बंद होऊनही सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात. दुसरीकडे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून वार्षिक परीक्षा घेतली जाते. पण, या प्रचलित पद्धतीत आता खूप बदल होणार असून एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या (पहिली ते नववी) उत्तरपत्रिका दुसऱ्या शाळांमधील शिक्षक तपासतील, असा बदल अपेक्षित आहे. २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासूनच बदलानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अन्य विषयांचेही प्रश्न
पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या गणित, इंग्रजीचे प्रश्न विज्ञान, इतिहास-भूगोल किंवा विज्ञान, भूगोल-इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणितावर आधारित प्रश्न असतील. जेणेकरून विद्यार्थी त्यांच्याकडील सरळज्ञान, समज, ज्ञानाचा वापर करून विचारपूर्वक उत्तर लिहू शकतील. घोकंपट्टीपेक्षा विद्यार्थ्यांकडील प्राप्त ज्ञान, माहितीचाच अधिकाधिक वापर उत्तरे लिहायला होईल, असे प्रश्नपत्रिकांचे स्वरूप राहणार आहे.

बदल गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वाचा असेल
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलणार असून त्यादृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. परीक्षा काळातील अभ्यासाचा ताण, घोकंपट्टी थांबावी हा त्यामागील प्रमुख हेतू असून सरळ ज्ञान, समज, यावर प्रश्न असतील.
– राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

दहावी-बारावीचा निकाल २२ मेपूर्वी
यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस अगोदर पार पडली आहे. आता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात राज्यातील नऊ विभागीय मंडळाच्या अध्यक्षांकडून त्याची पडताळणी होऊन निकाल छपाईसाठी पाठविले जाणार आहेत. त्यानुसार १५ मेपूर्वी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २० ते २२ मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी कुठली आहे याची माहिती बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

1 thought on “SSC HSC result link दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बोर्डाचा मोठा निर्णय.”

Leave a Comment