SSC HSC physics IMP 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये आता बोर्डाने अचानक काही नियम बदललेले आहेत अचानक बोर्डाने हा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आता या परीक्षा पद्धतीमध्ये काय महत्त्वाचे बदल झालेले आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षे पद्धतीवर काही फरक होणार बघूयात संपूर्ण माहिती
SSC HSC physics IMP 2025 पूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा ह्या सुरू झालेल्या आहेत यामध्ये आता दिवसेंदिवस बोर्डाकडून काही ना काही नवीन अपडेट येत आहे नवीन नियम समोरीत आहेत यातच बारावीच्या पहिल्या बोर्डाच्या पेपर नंतर बोर्डाकडून काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे कारण पहिला पेपर नंतर भरपूर केंद्रांवर हे गैरप्रकार झाले त्यानंतर बोर्ड आता ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे
राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणारी बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी भरारी पथके, बैठी पथके यांच्यासह अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ विभागीय मंडळांद्वारे होणाऱ्या या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीची ४२ प्रकरणे पकडण्यात आली
यापैकी सर्वाधिक प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात आढळली. या ४२ पैकी २६ प्रकरणे या विभागातील केंद्रांवर पकडण्यात आली. त्या खालोखाल पुण्यात आठ प्रकरणे आढळली आहेत. नऊपैकी सहा विभागांमधील एकूण १९ केंद्रांवर ही कॉपीची प्रकरणे घडली आहेत. मुंबई, कोकण आणि कोल्हापूर या विभागीय मंडळांवरील केंद्रांवर एकही कॉपीचे प्रकरण घडले नसल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
परीक्षांचा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने संचालन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. राज्यभर 3,373 केंद्रांवर बारावीची परीक्षा 18 मार्चपर्यंत आणि 5,130 केंद्रांवर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान पार पडणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी परीक्षेच्या सुरक्षेसाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 च्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले. परीक्षा केंद्र आणि त्याच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशावर पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रात कोणतेही अपायकारक साहित्य, पुस्तके, नोट्स किंवा मोबाईल आणू शकणार नाहीत. तसेच भरारी पथकाद्वारे प्रत्येक केंद्रावर सतत देखरेख ठेवण्यात येणार आहे.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी काय म्हणाले
ही प्रकरणे त्या-त्या केंद्रांवरील पर्यवेक्षकांनी पकडली असतील, तर ते केंद्र उत्तम काम करत आहे, असे समजले जाते. मात्र, भरारी पथकाने ती प्रकरणे पकडली, तर संबंधित केंद्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिह्न उपस्थित केले जाते. याबाबतची तपशीलवार माहिती हाती आली की, मग कारवाई करण्यात येईल, असेही गोसावी यांनी स्पष्ट केले. कोणत्याही केंद्रावर कॉपी, सामूहिक कॉपी किंवा पेपरफुटीची घटना घडल्यास पुढील वर्षी त्या केंद्राची मान्यता रद्द करण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे खबरदारी घ्यायची आहे, असे गोसावी म्हणाले.
सामूहिक कॉपी झाल्यास केंद्राची मान्यता रद्द-
दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या सामूहिक कॉपीच्या घटनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सामूहिक कॉपी आढळल्यास अशा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी. विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी मंगळवारी दिल्या.
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत आणि कॉफी मुक्त होण्यासाठी प्रशासन आणि राज्य महामंडळ बोर्ड यावर्षी भरपूर ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी काही गैरप्रकार केला तर त्यांना शिक्षा होणार आहे त्याचप्रमाणे भरपूर त्यांना मदत करणाऱ्या लोकांना देखील फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे
परीक्षा सुरू झाल्यापासून त्या विषयाचा पेपर सुटेपर्यंत पर्यवेक्षकाच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू राहतील. त्यांना झूम कॉलच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्या सर्वांची विशेषतः वर्गातील प्रत्येक हालचाल जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील कंट्रोल रूममधून समजणार आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवरील नेहमीची वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असे बोलले जात आहे..
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत याचीच माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा
जर बारावीला बोर्डात सर्व विषयात पास पण एक विषयात पास झालो नाही तर ग्रेस मिळतो का