Good news to students राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे कुठली आहे काय हे आपण पाहणार आहोत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना एक सुविधा मोफत मिळणार आहे ही सुविधा कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे कशामुळे मिळणार आहे त्याचा फायदा विद्यार्थ्यांना काय होणार आहे तेच माहिती आपण घेणार आहोत
Good news to students पूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यामध्ये विद्यार्थ्यांना आता एक सुविधा मोफत मिळणार आहे याचा लाभ घेऊन भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे याचा जर आपण लाभ घेतला तर भविष्यात आपल्याला याच आयुष्यात आपल्याला काय फायदा होईल याची माहिती आपण घेणार आहोत राज्य सरकारकडून आपल्याला विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि हे प्रशिक्षण म्हणजे कामगार कौशल्य प्रशिक्षण आहे आणि प्रशिक्षणाच्या आधारे तुम्हाला एकदा चांगला जॉब मिळू शकतो.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सरकार चालवणार
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ योजने (Acharya Chanakya Skill Development Centre Scheme) अंतर्गत मान्यता दिलेल्या प्रत्येक महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रमाणे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना (Free education for 1 lakh 50 thousand youth) कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती, कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.
राज्यातील विविध शासकीय विद्यापिठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणीची कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट करता येतील. मंत्रालय येथील दालनात मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट सांमजस्य करार झाला आहे, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.
राज्यातील 200 महाविद्यालयात शिक्षण मिळणारं
मुंबई विद्यापीठ व राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे २०० पेक्षा अधिक महाविद्यालय यामध्ये समाविष्ट होतील अशी आशा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे.
यानुसार, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत राज्यातील महाविद्यालयांमध्ये “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK)” स्थापन करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करून १५ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून, त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याकरिता केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या Common Cost Norms नुसार कौशल्य विकास केंद्रांना विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येत आहे.
यासाठी पात्रता काय आहे
या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील संबंधित प्रशिक्षणासाठी आवश्यक किमान पात्रतेनुसार युवक-युवती पात्र आहेत. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेकरिता संपूर्ण राज्य अनुदानित प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाच्या निधी मधून योजना सुरू करण्यात आली असल्याचेही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले आहे
अशाप्रकारे आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट राज्य सरकारकडून मोफत मिळाला आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप टेलिग्राम वरून डाऊनलोड करा