SSC HSC IMP Questions 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक धक्कादाय बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये कॉपी करू द्या अन्यथा अशा प्रकारच्या काही घटना प्रत्येक सेंटरवर काही घडत आहे याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आपण आज पाहणार आहोत
SSC HSC IMP Questions 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा राज्यातील महत्त्वाच्या परीक्षा असतात कारण या परीक्षेच्या आधारे पुढील भविष्या मुलांचे ठरत असतं आता राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू होण्यास अवधी दोन दिवस बाकी आहेत परंतु बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत मात्र राज्यांमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा काही ठिकाणी फज्जा उडालेला आहे.
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही ठिकाणी गैरप्रकार होत आहेत विशेषता मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी केंद्रावर गैरप्रकार होऊन विद्यार्थ्यांनी केंद्र संचालक असतील शिक्षक असतील त्यांनाच धमक्या देण्यात सुरू केलेले आहे काही एका ठिकाणी तर एका केंद्रावर विद्यार्थ्यांनी थेट विद्यार्थ्यांनी शिक्षकांना धमकी देण्यास सुरुवात केली जाईल त्यामुळे आता शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आलेले आहे या सर्व गोष्टीचा शिक्षक संघटनांनी विरोध देखील केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना त्वरित बरकास्त करा अन्यथा आम्ही परीक्षांवर बहिष्कार टाकू अशाप्रकारे त्यांनी निर्णय घेतलेला आहे
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या काळात परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून प्रयत्न करत आहे. मात्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात बारावीच्या परीक्षेत काही केंद्रावर आतुन तमाशा बाहेरुन किर्तन अशी अवस्था सुरु आहे.
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे आदेश धाब्यावर बसविण्याचे काम काही संस्था चालकांकडुन सुरु आहेत.
राज्यातील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार
पुण्यातील एका एजंटकडुन पाथर्डीत १५० विद्यार्थी आणलेले आहेत. त्यांचा शाळा प्रवेश स्थानिक विविध महाविद्यालयातुन दाखलेला आहे. काही भागात काँपी बंद करण्यात प्रशसानाला यश आले असले तरी काही केंद्रावर रासरोसपणे कॉपी सुरु आहे. पालकांच्या झुंडीच्या झुंडी केंद्राच्या बाहेर पळताना दिसत आहेत. तालुक्यातील बारा परीक्षा केंद आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
राज्यात दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या सुरळीत व्हायला पाहिजेत कुठल्या परीक्षा केंद्रावर जर गैरप्रकार झाला अशा परीक्षा केंद्राची कायमची मान्यता रद्द करण्यात येणार त्याचप्रमाणे 100 मीटर परिसरामध्ये 144 कलम लागू होणार आहे आणि जो कोणी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉफी वगैरे करूनच प्रयत्न करणार त्याच्यावर देखील फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत
ग्रामीण भागातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात रासरोसपणे कॉपी पुरविली जाते. यामधे पालकांचा सहभाग मोठा आहे. कॉपी पकडणाऱ्या पथकाला पालकांकडुन शिवीगाळ करण्याचे किरकोळ प्रकारही सुरुच आहेत. आमच्याकडे दगड आहेत याची जाणीव कॉपी पथकाने ठेवावी असा सजज्ड दम पालक पथकातील सदस्यांना देत आहेत.
पालकांचा शिक्षकांना दम.
नोकरी करायची तर निट करा आमची पोर पोलिस भरतीला जातील त्यात अडथळा ठरु नका असा इशारा पालक देत आहेत. जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालुन पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातील केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. पा थर्डी तालुक्यातील शहरासह काही केंद्रावर कॉपीला आळा घालण्यात यश आले आहे. मात्र ग्रामीण भागातील काही केंद्रावर रासरोसपणे कॉपी सुरु आहे. तेथील शिक्षकावर जिल्हाधिकारी वॉर रुममधुन कारवाई होण्याची शक्यता आहे.
अशाप्रकारे आपण वरील लेखनामध्ये पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये काही प्रकारे गैरप्रकार होत आहेत याबाबत आपण मोठे अपडेट पाहिले आहे तर आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा