SSC HSC exam update 2025 दहावी बारावी बोर्डाचा पेपर आता सुरू होणार आहेत या महिन्यामध्ये बारावी बोर्डाचे पेपर उद्यापासून सुरू होत आहे तर दहावीचे पेपर हे जवळपास 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत या संदर्भात आपण पाहणार आहोत की बोर्डाचा पेपर आपण कुठल्या पेन आणलेला पाहिजे कशाप्रकारे दिला पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत
SSC HSC exam update 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळ आलेल्या आहेत बोर्डाच्या परीक्षा आता उद्यापासून सुरू होत आहेत यामध्ये जवळपास राज्यातील 34 लाख विद्यार्थी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा देत आहेत तर या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्यासमोर येत आहे की बोर्डाच्या परीक्षेत जातानी आपण काय वस्तू घेऊन गेल्या पाहिजेत कुठल्या वस्तू घेतल्या नाही पाहिजेत त्याचप्रमाणे बोर्डाचे पेपर आपण कुठल्या पेनाने लिहिला पाहिजे याचीच माहिती आपण घेणार आहोत
उद्या11 फेब्रुवारीपासून 12 वी तर, 21 फेब्रुवारीपासून 10 वीची परीक्षा सुरू होणार आहे. या दोन्ही परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दक्षता समितीची बैठक घेवून महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. शिवाय केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवर ड्रोन कॅमेऱ्यांचा वॉच असेल. ज्या शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास येईल, त्या शाळेची परीक्षा केंद्रासह मान्यताही रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशाराही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिला आहे.
10 वी व 12 वीची बोर्ड परीक्षेसंदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे, पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे आदी उपस्थित होते. दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12 वीचे पेपर होतील. दि.21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान 10 वीचे पेपर होतील.
परीक्षा केंद्रात या वस्तू घेऊन जाऊ शकता
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत तुम्ही परीक्षा संदर्भात पेपर देताना तुमचा पॅड पेन पट्टी त्याचप्रमाणे तुमचा कंपास बॉक्स पेन्सिल रबर तुमच्या हॉल तिकीट या सर्व गोष्टी घेऊन जाऊ शकता
परीक्षा केंद्रात कुठल्या वस्तू घेऊन जाता येणार नाही
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत तुम्हाला मोबाईल उपकरणे इलेक्ट्रॉनिक उपकरणे गॅझेट इयरफोन ब्लूटूथ या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन जाता येणार नाही त्याचप्रमाणे कॅल्क्युलेटर डिक्शनरी यांचा वापर देखील करता येणार नाही.
कोणत्या पेनाने पेपर दिल्यास रद्द होणार
दहावी बारावी बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला जवळपास पेन्सिल पेन वापरण्यास कोणतीही अडचण नाही तुम्ही जर ब्लॅक पेन किंवा ब्लू पेन वापरत असाल तर तुम्हाला पेपरात कोणतीही अडचण येणार नाही परंतु तुम्ही जर हायलाईटर पेपर वापरले किंवा रेड पेन ने पेपर लिहिला तर तुमचा पेपर हा रद्द केला जाऊ शकतो.
परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी उपाय योजना
संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेरे.
- गैरप्रकारात सहभागी परीक्षा केंद्राची मान्यता रद्द.
- गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द
- परीक्षा केंद्रांचे पथकामार्फत वेबकास्टींग मॉनिटरींग
- परीक्षा केंद्रावरील बैठे पथकांचे दोन स्तर
- मोबाईल अँपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर वॉच
- सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असणार
- जिल्हा आणि तालुकास्तरावरुन विशेष भरारी पथक
- संवेदनशिल केंद्रावर जास्त बंदोबस्त
- राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथके
‘त्या’ केंद्रांवर बाहेरील पर्यवेक्षक
मागील 5 वर्षाच्या परीक्षेत ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत, अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे, परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहणार आहे.
कशी असेल पथकांची रचना
एकूण सात भरारी पथके असणार आहेत. जिल्हाधिकारी, डाएटचे प्राचार्य, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, योजनेचे शिक्षणाधिकारी, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील महिला अधिकारी यांचे, असे सात पथके असणार आहेत. प्रत्येक पथकात तीन सदस्यांचा समावेश असेल. त्यात एक महिला असणार आहे.
तर अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या पेन वापरल्यानंतर आपला पेपर हा रद्द होऊ शकतो याची संपूर्ण माहिती आपण पाहिली दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी या क्रमांकावर 9322515123फोन करा चांगले मार्क मिळतील आणि आमच्या नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर डाऊनलोड करा तसेच लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा