SSC HSC english IMP 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या सुरू झालेल्या आहेत या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेले आहेत बोर्डाच्या परीक्षेचे लाईव्ह रेकॉर्डिंग होणार आहे या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेले आहे याचीच माहिती आपण पाहणार आहोत
SSC HSC english IMP 2025 पूर्ण माहिती
राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बारावी बोर्डाचे पेपर सुरू झालेले आहे दहावीचे पेपर आता 21 फेब्रुवारी पण सुरू होत आहेत यासंदर्भात राज्यात कॉफी मुक्त अभियान राबवण्यात येत आहे त्यामुळे कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक शाळा केंद्रावर सीसीटीव्ही बंधनकारक आहे त्याचप्रमाणे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील केलेले आहेत कुठलाही गैरप्रकार घडू नये म्हणून परीक्षेच्या ठिकाणी 144 कलम देखील लागू करण्यात आलेले आहेत झेरॉक्सचे दुकानात बंद असणार आहे
परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून प्रत्येक परीक्षा हॉलमधील पर्यवेक्षकांकडील मोबाईलचे कॅमेरे सुरू ठेवले जाणार आहेत. त्यांच्या वर्गातील प्रत्येक हालचालीवर जिल्हाधिकारी त्यांच्या कार्यालयातील कंट्रोल रूममधून लक्ष ठेवणार आहेत.
याशिवाय कॉपीसारखा गैरप्रकार आढळून आल्यास आता संबंधित विद्यार्थ्यासह तेथील केंद्र संचालक,
पर्यवेक्षकाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील बोर्डाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षा हॉलमध्ये जातानाच अंगझडती घेऊन तपासून आत सोडले जाणार असून मुलींच्या तपासणीसाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नेमले जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकाची नजर असणार आहे. केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी व्हिडिओग्राफर देखील असणार आहे. एका परीक्षा हॉलमध्ये २५ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असणार आहे
प्रश्नपत्रिका भेटल्यावर काय करावे
प्रश्नपत्रिका मिळताच तिच्या वरील भागावर, प्रत्येक पानावर उजव्या बाजूस विद्यार्थ्यांनी स्वतःचा बैठक क्रमांक लिहावा. निर्धारित दहा मिनिटांत प्रश्नपत्रिकेचे फक्त वाचन करावे. त्यानंतर उत्तरपत्रिकेच्या पान क्रमांक तीनपासून उत्तरे लिहिण्यास सुरुवात करावी. उत्तरपत्रिकेवर निळ्या अथवा काळ्या शाईचाच वापर करावा. अन्यथा, मजकुरास गुणदान केले जाणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे गोष्टी आहेत
1)परीक्षेला येताना प्रवेशपत्र, ओळखपत्र रोज बरोबर आणावे.
२)पर्यवेक्षकांकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांकाची खात्री करावी.
३) उपस्थिती पत्रकावर बैठक क्रमांक, बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करावी.
४)त्यानंतर बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवरच चिकटवावे.उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर, पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठराविक रकान्यात बैठक क्रमांक अंक, अक्षरात बिनचूक लिहून स्वाक्षरी करावी.’उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या विविध सूचना विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी. शिक्षकांकडून या सूचना जाणून घ्याव्यात.
कच्चे लिखाण कुठे करावे
कच्चे लिखाण करावयाचे असल्यास ते पेन्सिलनेच आणि उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पानावर करावे. त्यावर ‘कच्चे लिखाण’ असा स्पष्ट उल्लेख करावा. सुट्या कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करू नका. उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नका. केवळ डाव्या बाजूलाच समास सोडा. पर्यवेक्षकाकडून घेतलेल्या उत्तरपत्रिकेवर आणि पुरवण्यांवर पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी, आदी सूचना बोर्डाने विद्यार्थ्यांना केल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी परीक्षा तणामुक्त द्याव्यात अशा प्रकारचा आव्हान राज्याचे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केलेला आहे विद्यार्थ्यांनी सुरळीत प्रकारे परीक्षा द्यावेत कुठलाही गैरप्रकार करू नये आणि कुणालाही करण्यास प्रवृत्त करू नये असे जर कोणी केले तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे
अशाप्रकारे आपण दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात लाइव रिकॉर्डिंग होणार आहे याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी टेलिग्राम किंवा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याचप्रमाणे दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा