SSC HSC boards exam 2025 आज आपण पाहणार आहोत की उद्या बारावी बोर्डाचा पेपर इंग्रजीचा आहे यातच बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत उद्या बारावीचा बोर्डाचा पेपर असल्यामुळे सर्वत्र यंत्रणा सतर्क झालेले आहेत आणि बोर्डाने महत्त्वपूर्ण असा एक निर्णय घेतलेला आहे
SSC HSC boards exam 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा आता या महिन्यात सुरू होत आहेत यातच आता बारावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर उद्या आहे यामुळे आता बोर्डाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत या संदर्भात आपण पूर्ण माहिती पाहणार आहोत बारावी बोर्डाच्या इंग्रजीचा पेपर हा बोर्डाच्या यावर्षीचा पहिला पेपर असणार आहे
बारावीच्या हॉल तिकीट मध्ये काही बदल करण्यात आले होते तर काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये विषय वेगळे होते आणि पेपर वेगळा होता आणि त्यांनी वर्षभर वेगळा अभ्यास केला होता असा काहीतरी गोंधळ निर्माण झाला होता आता विद्यार्थ्यांनी काळजी करू नये अशा प्रकारे बोर्डाने आव्हान केलेले आहे.
उद्या बारावी बोर्डाचा इंग्रजी पेपर
राज्यातील दहावी बारावी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी आता बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या कारण उद्या बारावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर आहे हा पेपर अत्यंत महत्त्वाचा असतो आणि बोर्डाच्या परीक्षेचा कॉपीमुक्त अभियान हे राबविण्यात येत आहे की नाही हे आता उद्या करणार आहे कारण उद्या बारावी बोर्डाचा इंग्रजीचा पहिला पेपर आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी स्ट्रेस मुक्त तणावमुक्त परीक्षा द्यावी
बोर्डाने विद्यार्थ्यांना केले आव्हान
उद्या बारावी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर आहे यादी बोर्डाने आता मोठं आव्हान केलेले आहे राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होणार आहेत सर्वत्र सीसीटीव्ही बंधनकारक आहेत परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू आहे त्याचप्रमाणे झेरॉक्स केंद्र बंद असणार आहेत फौजदारी गुन्हा दाखल होणार कुणी काय गैरप्रकार प्रकार केला तर सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा तणाव मुक्त अभ्यास करावा आणि आनंदित पेपर लिहावा अशा पकारे बोर्डाने विद्यार्थ्यांना आव्हान केलेले आहे.
झूम’वर जॉईन असतील पर्यवेक्षक
परीक्षा सुरू झाल्यापासून त्या विषयाचा पेपर सुटेपर्यंत पर्यवेक्षकाच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू राहतील. त्यांना झूम कॉलच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्या सर्वांची विशेषत: वर्गातील प्रत्येक हालचाल जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातील कंट्रोल रूममधून समजणार आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवरील नेहमीची वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे सांगण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असे बोलले जात आहे.
कॉपीसारखा गैरप्रकार आढळून आल्यास आता संबंधित विद्यार्थ्यासह तेथील केंद्र संचालक, पर्यवेक्षकाविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील बोर्डाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षा हॉलमध्ये जातानाच अंगझडती घेऊन तपासून आत सोडले जाणार असून मुलींच्या तपासणीसाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नेमले जाणार आहेत. याशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकाची नजर असणार आहे. केंद्रावरील हालचाली टिपण्यासाठी व्हिडिओग्राफर देखील असणार आहे. एका परीक्षा हॉलमध्ये २५विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असणार आहे.
इयत्ता १० वी व १२ वी फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये आयोजित परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त घेण्याच्या उद्देशाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना परीक्षा केंद्रावर करण्यात येत आहेत. २०१८ ते २०२४ या कालावधीत ज्या परीक्षा केंद्रावर काॅपीची प्रकरणे आढळले आहेत.
त्या परीक्षा केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षा केंद्रावर दहावी, बारावी परीक्षेच्या वेळी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व इतर कर्मचारी वर्ग यांची नियुक्ती सदर केद्रांस संलग्न करण्यात आलेल्या शाळा/कनिष्ठ महाविदयालय या व्यतिरिक्त इतर शाळा / कनिष्ठ महाविदयालयामधून करण्यात यावी. याबाबत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्ष घ्यावी, असे कारेकर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दहावी – बारावी परीक्षा कॉपीमुक्त करण्याच्या उद्देशाने परीक्षा केंद्रातील केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय रद्द करावा अन्यथा परीक्षा प्रक्रिया व पेपर तपासणीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटना व शिक्षक आमदारांनी दिल्यानंतर प्रशासनाने नरमले असून या निर्णयामध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता २०१८ ते २०२४ या कालावधीत ज्या केंद्रांवर कॉपीची प्रकरणे आढळली, फक्त त्याच केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
अशाप्रकारे आपण की दहावी बारावी बोर्डाची परीक्षा आता या महिन्यात सुरू होत आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी या 93225151क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.