SSC HSC board exams 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा अत्यंत जवळ आलेले आहे या संदर्भात आता बोर्डाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेल्या आहेत एका वर्गात किती विद्यार्थी प्रवेश क्षमता असणार आहे याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
SSC HSC board exams 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षा असतात या परीक्षा आता या महिन्यातच होणार आहेत बारावी बोर्डाचा पेपर दहावी बोर्डाचे पेपर सर्वत्र चर्चा चालू आहे तरी तुम्ही काही ताण तणाव घेऊ नका बोर्डाच्या परीक्षा यात साला दरशाला प्रमाणे येत राहतात आता यामध्ये काही निर्णय घेण्यात आलेल्या आहेत तसेच आपण पाहणार आहोत की एका वर्गामध्ये किती विद्यार्थी बसणार आहे
बोर्डाने काही घेतलेली महत्त्वपूर्ण निर्णय
यावर्षी राज्यात कॉपी मुक्त परीक्षा साठी बोर्डाने भरपूर अशी कठोर निर्णय घेतलेला आहे जसे की प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आलेला आहे कॉपी प्रकरण गैरप्रकार घडला तर त्या शाळेची मान्यता रद्द होणार आहे शाळेचा केंद्र रद्द होणार आहे संचालक आणि पर्यवेक्षक यांच्यावर गुन्हा देखील दाखल होणार आहे राज्यात कॉफी मुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येत आहे.
एका वर्गात किती विद्यार्थी बसणार
परीक्षा देण्यासाठी दहावी बारावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी एका वर्गात परीक्षा दरम्यान जास्तीत जास्त25 विद्यार्थी बसू शकतात 25 पेक्षा जास्त जर विद्यार्थी एका वर्गात बसले तर त्यांच्यावर कारवाई होईल 25 पेक्षा कमी असतील तरी चालतील परंतु 25 पेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्गात बसू शकणार नाहीत.
मुख्य सचिव काय म्हणाले
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या इयत्ता १२ वी आणि १०वी च्या परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणास पूर्णत: प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान कठोरपणे राबविण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
राज्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात असे सांगितले आहे
यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सौनिक यांनी आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल या वेळी उपस्थित होते. शालेय शिक्षण आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरचित्र संवाद माध्यमातून सहभागी झाले.
कॉपी टाळण्यासाठी आदेश काय?
● परीक्षांच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे देखरेख करण्यात यावी.
● परीक्षा केंद्रांबाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात यावे.
● परीक्षा सुरू होण्याआधी एक दिवस परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री करावी.सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके, बैठी पथके उपलब्ध करावीत.
● जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची ‘चेहरा पडताळणी व्यवस्थे'(फेस रेकग्निशन) तपासणी करण्यात येणार आहे. तसेच संबंधितांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे.
गैरप्रकार घडल्यास गुन्हा दाखल
परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास त्याला उद्याुक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा. परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात यावीत. परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत एका वर्गात किती विद्यार्थी बसणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहिली दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.