WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam update 2025 दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक बदलणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board exam update 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत जवळ आलेले आहेत यातच आता बोर्डाचे काही निर्णय विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना देखील अडचणीत आणणारे आहेत त्यामुळे आता या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार का याची माहिती आपण पाहणार आहोत

SSC HSC board exam update पूर्ण माहिती

दहावी बारावी विद्यार्थ्यांना आता बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत त्यातच आता बोर्डाचा एक निर्णय आहे की तो शिक्षकांना काही मान्य नाहीये तो निर्णय म्हणजे पहिला होता तो सीसीटीव्ही प्रत्येक केंद्रावर असणे हा निर्णय आता स्वीकार झालेला आहे परंतु दुसरा आणखीन एक बोर्डाने निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये शाळेवरचे शिक्षक हे त्यांचे परिकक केंद्रावर नसतील तर दुसऱ्या शाळेतील शिक्षक या शाळा केंद्रावर परीक्षक असतील

शिक्षकांचा या निर्णयाला विरोध
दहावी बारावी बोर्डाच्या शाळेतील जे काही शिक्षक आहेत शिक्षक संघटना आहेत यांनी बोर्डाच्या या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की शाळा केंद्रावर उपस्थित शिक्षकच पर्यवेक्षक असले पाहिजेत कारण दुसऱ्या शाळेतील शिक्षक वेळेवर पोहोचतील की नाही त्याचप्रमाणे त्यांना भत्ता दिला जाणार का नाही असे वेगवेगळे प्रश्न हे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना समस्या तयार होत आहे

बोर्डाची आणखीन एक निर्णय अडचणीत
बोर्डाने आणखीन एक निर्णय घेतला होता यावर्षी तो म्हणजे हॉल तिकीट वर विद्यार्थ्यांची जात याचा उल्लेख होता तो निर्णय देखील आता समाजा मधून विरोध झाल्यानंतर बोर्डाने रद्द केलेला आहे हा निर्णय देखील रद्द होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे

SSC HSC board exam update 2025 राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षा घेतल्या जात असतात. त्या आता अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय शिक्षक संघटना अमान्य करीत आहे. असे निर्णय ग्रामीण पातळीवार कसे अंमलात आणणार हे आयएएस अधिकाऱ्यांना समजते काय, असा थेट सवाल करीत मुख्याध्यापक व अन्य संघटनानी बहिष्कार अस्त्र उपसले आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा संबंधित शाळा केंद्रातील केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षकेतर यंत्रनेत बदल करून घ्याव्या, असे निर्देश आहे. म्हणजे परीक्षा केंद्रात त्याच शाळेतील स्टाफ नकोच. पण हा निर्णय म्हणजे शिक्षक वर्गावर अविश्वास दाखविण्याचा प्रकार व त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा ठरतो. म्हणून हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आहे. एका पत्रातून परीक्षा प्रक्रिया व पेपर तपासणी यावर बहिष्कार टाकण्यात येइल असा इशारा देण्यात आला. इशारा मिळताच प्रशासनाने चर्चा केली. यातून काय मार्ग काढता येइल, यावर विचार झाल्याचे शिक्षक नेत्याने सांगितले

राज्य शिक्षण मंडळाकडून प्रश्नपत्रिका ‘थ्री लेअर पॅकिंग’मध्ये येतात. सर्व संबंधित अधिकारी वर्गाच्या स्वाक्षऱ्या झाल्यावर त्या विद्यार्थ्यांसमोर उघडल्या जातात. केवळ एकाच नव्हे तर पाच, सहा शाळांचे विद्यार्थी येथे असतात. केंद्र संचालक व उपसंचालक यांच्या सहा तपासणी फेऱ्या होतात. तरीही हा हा अविश्वास दाखविण्याचा प्रकार का, असा प्रश्न शासनास करण्यात आला आहे.

शिक्षक संघटनेचे अध्यक्ष काय म्हणाले SSC HSC board exam update

विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप याबाबत म्हणाले, की शिक्षक संघटना नेहमी सहकार्य करण्याच्या भूमिकेतच असतात. पण आता शिक्षकांवर अविश्वास दाखविण्याचा प्रकार घडत आहे. परीक्षा केंद्रावर त्याच शाळेतील नव्हे तर अन्य शाळेतील शिक्षक परीक्षा घेतील, असा आदेश. पण अन्य शाळेतील शिक्षक नेमले तर ते वेळेवर पोहचणार का, त्यांना प्रवास भत्ता मिळणार का, त्यांच्या शाळेतील अध्यापन व अन्य जबाबदाऱ्या कोण सांभाळणार, याचे उत्तर दिले गेले पाहिजे. आम्ही शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची भेट घेऊ. पण अडून राहण्याची भूमिका दिसल्यास बहिष्कार टाकणार. शिक्षक वर्गात असंतोष आहे. परीक्षा घेणे व परत शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकविणे शक्य नाही. दीड महिना शाळा बंद ठेवायची का, असा प्रश्नही त्यांनी केला.

तर अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या अडचणीचे यावर्षीचे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी चे निर्णय घेतलेले आहेत ते अडचणीतच सापडत आहेत तरी आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या नंबर वर संपर्क करावा किंवा प्लेस्टोर वरून नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा

Leave a Comment