SSC HSC board exam new hallticket आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेले आहेत यातच आता एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा आधीच हॉल तिकीट हे सर्वांचे रद्द करण्यात आलेले आहे ते का केलेत त्याच्यामुळे आणि नवीन हॉल तिकीट कधी मिळणार याचीच माहिती आपण घेणार आहोत.
SSC HSC board exam new hallticket पूर्ण माहिती
इयत्ता दहावी आणि इयत्ता बारीवीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर अशा प्रकारचे जात प्रवर्गाचा उल्लेख कशामुळे करण्यात आला? त्यामागचा उद्देश काय आहे? असे विचारण्यात येत होते
. या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे. आता इयत्ता 10 आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी नव्याने प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे
दहावीचे हॉल तिकीट उद्यापासून जनरेट होणार होते आणि बारावीचे हॉल तिकीट वाटप झाले होते परंतु यामध्ये काही अडचण आल्यामुळे जसं की दहावी बारावीच्या हॉल तिकीटवर यावर्षी जात प्रवर्ग दिला होता यावर काही लोकांनी आक्षेप घेतला त्यामुळे जास्त वादविवाद होण्याच्या आधीच बोर्डाने आपला निर्णय मागे घेतला त्यामुळे आता विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट डाऊनलोड करावे लागेल
नेमका आक्षेप कशावर होता? SSC HSC board exam new hallticket
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यामागे नेमका काय हेतू आहे, असा प्रश्न विचारण्यात येत होता. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी जातीच्या प्रवर्गाचा उपयोग काय? असाही सवाल करण्यात येत होता.
त्यावर शाळेत विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद नेमकी काय झाली आहे, पालक तसेच विद्यार्थ्यांना समजावे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्या येत होते. मात्र शिक्षण मंडळाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध झाल्यानंतर शेवटी शिक्षण मंडळाने दिलगीरी व्यक्त करून हा निर्णय मागे घेतला आहे.
या तारखेला हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल
या विरोधानंतर शिक्षण मंडळाने हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तसेच नव्याने हॉल तिकीट जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना 23 जानेवारी 2025 पासून हे नवे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना 20 जानेवारी 2024 रोजीच्या दुपारी तीव वाजेपासून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.
बोर्डाने नेमके काय म्हटले
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळाचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुकवार दिनांक 10/01/2025 रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
बोर्डाने काही विशेष सूचना दिले आहे SSC HSC board exam new hallticket
या संदर्भात कळविण्यात येते की, 1) मंडळाने उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रांवरील (Hall Ticket) सदरचा जातीचा प्रवर्ग (Caste Category) कॉलम रद्द करण्यात येत असून विद्याथ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे
तशीच राहील याची नोंद घ्यावी. सदरची नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे (Hall Ticket) गुरूवार दिनांक 23/01/2025 पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलव्ध करून देण्यात येत आहेत.
2) तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांच्या प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) हा कॉलम रद्द करण्यात येत असून सदरची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर सोमवार दिनाक 20/01/2025रोजी दुपारी 03.00 वाजेपासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
तसेच download संदर्भातील उर्वरित इतर सूचना व विद्यार्थ्यांची परीक्षाविषयक माहिती आहे तशीच कायम राहील, यात कोणताही बदल होणार नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी उपरोक्त बाबींची नोंद घ्यावी.
वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कुठली आनंदाची बातमी आहे ही पाहिले आहे दहावी बारावी बोर्ड नोट्स साठी 9322515123 या नंबर वर संपर्क करा आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा