SSC HSC board exam 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत कोणता बदल झालेला आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी हे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बोर्डाच्या परीक्षेत यावेळेस काही महत्त्वाचे बदल केलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या बदलाची जाणीव असणे गरजेचे आहे
SSC HSC board exam 2025 पूर्ण माहिती
दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा अत्यंत जवळ आलेल्या आहेत या परीक्षा पद्धतीत काही महत्त्वाचे बदल यावर्षे होणार आहेत साला दर सालाप्रमाणे दहावी-बारावीच्या परीक्षा या होत आहेत परंतु यावर्षी राज्य सरकार त्याचप्रमाणे बोर्डाने त्यातूनच परीक्षा करण्यासाठी महत्त्वाचे बदल केलेले आहेत या बदलांवर विद्यार्थ्यांवर काही परिणाम होईल का हा विद्यार्थ्यांसाठी कोणते बदल झालेत आहेतः पाहुयात
यावर्षी एवढे विद्यार्थी बोर्ड परीक्षेत बसले आहेत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत यंदा 14 लाख 94 हजार बारावीचे विद्यार्थी, तर 16 लाख 7 हजार दहावीचे, असे एकूण 31 लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी तब्बल 1 लाख 80 हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. राज्य मंडळाकडून परीक्षांची आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, परीक्षा सुरळीत पार पाडण्यावर राज्य मंडळाचा भर असल्याचे राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
बोर्ड परीक्षा वेळापत्रक
बारावीची परीक्षा 11 फेबवारी ते 18 मार्च आणि दहावीची परीक्षा 21 फेबवारी ते 17 मार्चदरम्यान घेण्यात येणार आहेत. त्यानुसार दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत दरवर्षी कॉपी केसेस, बोगस विद्यार्थी सापडणे, समूह कॉपी, पेपर व्हायरल होणे, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. यंदा मात्र राज्य मंडळ गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणार आहे. त्यासाठी राज्यमंडळाकडून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.
राज्यात यावर्षी सर्वात मोठे आव्हान म्हणजे कॉफीमुक्त परीक्षा घेणे आहे कारण गेल्या वर्षी काही कॉफी प्रकरण झाले होते म्हणून यावर्षी राज्यात कॉपी मुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येणार आहे यामुळे राज्यात कॉपी सेंटर नसणार आहेत ज्या सेंटरवर कॉपी झाली त्या सेंटरची कायमची मान्यता रद्द करण्यात येणार आहे शिक्षकांची अदलाबदली काही ठिकाणी आहे त्याचप्रमाणे सीसीटीव्ही झोन आहे 144 कलम लागू आहेत काही महत्त्वाचे बदल आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन व राज्य मंडळ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली.या दूरचित्र प्रणाली बैठकीमध्ये कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा नेमके बदल कोणते
संवेदनशील परीक्षा केंद्रांची ड्रोन कॅमेऱ्याद्वारे निगराणी.
- परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची खात्री पटविणार.
- परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करणार.
- कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी
- पथके व बैठी पथके राहणार.
- परीक्षा केंद्रांवर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेशिअल सिस्टिमद्वारे तपासणी होणार.परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार.
- परीक्षा केंद्रांपासून 500 मीटर परिसरात
- झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार.
- परीक्षा केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार.
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी काय म्हणाले
दहावी बारावी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलेला आहे की विद्यार्थ्यांनी परीक्षा या तणावमुक्त द्यावेत कुठलाही तणाव त्यांनी घेऊ नये राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होणार आहे त्यामुळे कोणीही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार.केल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे
अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत दहावी-बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
I am 12th student.