SSC HSC board 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेल्या यातच आता बोर्डाने काही महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आता चिंता वाढलेले आहे याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
SSC HSC board 2025 पूर्ण माहिती
दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च (SSC, HSC Exam-2025) होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत केंद्रावरील सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित (Keeping CCTV cameras operational) असल्याबाबतचे हमीपत्र विभागीय मंडळ आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी (माध्यमिक) सर्व शाळांकडून मागितले आहे
बोर्डाचा निर्णय SSC HSC board 2025
राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षेसाठी हा प्रयत्न होत असला तरीही वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करणे, म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविण्यासारखे असल्याचे म्हणत त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली (Teachers expressed displeasure) आहे.
शिक्षक वर्ग नाराज SSC HSC board 2025
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणार्या परीक्षेसाठी केंद्र परिसरात तसेच केंद्रावरील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असल्याबाबतचे हमीपत्र विभागीय मंडळ आणि जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करण्याची सूचना काही जिल्हाधिकाऱ्यांनी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र संचालकांना दिल्या आहेत. त्यानंतर हा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
परीक्षेच्या कालावधीत सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंग परीक्षा संपल्यानंतरही आपल्याकडे स्वतंत्ररीत्या जतन करून ठेवणे आवश्यक आहे. विभागीय मंडळाच्या मागणीनुसार हे रेकॉर्डिंग त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे.
परीक्षा केंद्रावर अखंडित वीजपुरवठा असावा यासाठी जनरेटर किंवा इन्व्हर्टर कार्यान्वित असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सुविधा असल्याचे हमीपत्र सादर करण्याची सूचना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिल्या आहे
SSC HSC board 2025 १०वी १२वी बोर्डाचा मोठा निर्णय विद्यार्थ्यांची चिंता वाढली
सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असणे बाबत शासनाच्या आदेशात फक्त शालेय परिसर असा उल्लेख आहे. मात्र, बोर्ड परीक्षेच्या प्रसंगी प्रत्येक वर्ग खोलीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करण्याचा प्रकार राज्य मंडळ बोर्डाचा कोणताही आदेश नसताना विभागीय सचिव आणि काही जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे याबाबत कोणताही निधी शासन देत नाही.
वरील लेखनात आपण दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कुठली आनंदाची बातमी आहे ही पाहिले आहे दहावी बारावी बोर्ड नोट्स साठी 9322515123 या नंबर वर संपर्क करा आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा