WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board 2025 दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC board 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेले आहेत यामध्ये काही धक्कादायक प्रकार घडलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

SSC HSC board 2025 पूर्ण माहिती

राज्यातील बारावी बोर्डाच्या परीक्षा या सुरळीत सुरू असताना काही धक्कादायक बातम्या समोर येत आहेत त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षा देखील आता जवळपास सुरू होणार आहेत 21 फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षा या सुरू होत आहेत बारावी बोर्डाच्या परीक्षांमध्ये पहिल्या पेपरानंतर जवळपास राज्यात 46 कॉपी प्रकरण समोर आले आहे यात काही धक्कादायक प्रकरणासमोर आलेले आहेत पहिल्या पेपर नंतर दुसऱ्या पेपरामध्ये पण तिसऱ्या पेपरामध्ये पण अशा प्रकारची कॉपी प्रकरण चालू आहेत त्यामुळे राज्यातील कॉपीमुक्त अभियान याला मोठा धक्का बसलेला आहे.

राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेला (Exam) 11 फेब्रुवारी) पासून सुरुवात झाली. दरम्यान परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला  राज्यात अनेक परीक्षा केंद्रांवर कॉपीची (Copy) प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी, भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून यंदा 12 वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून मुख्यमंत्र्यांनी ही या संदर्भात कठोर अमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

अशातच, (12 फेब्रुवारी) हिंदीच्या पेपरला ही कॉपी (Copy) झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परभणीच्या झरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेंटरवर अकरा कॉपी-बहाद्दरांना शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी पकडले आहे. दरम्यान, या कॉपी करणार्‍यांवर कारवाई सुरू असून याच सेंटरवर संबर येथील महाविद्यालयाच्या 108 विद्यार्थ्यांनी थेट पेपरलाच दांडी मारल्याचा प्रकारही समोर आला आहे.

स्वतःचा जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना कॉप्यांचा पुरवठा

बीडमध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. शिक्षण विभागाकडून कॉपी रोखण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली. मात्र या सर्व नियमांना हरताळ फासत बीडमध्ये जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आली आहे. बारावीच्या काल पहिला पेपर होता आणि याच पेपर साठी बीड शहरातील बलभीम महाविद्यालयासह इतर परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र या बंदोबस्ताला न जुमानता अनेकांनी कॉप्या पुरवण्याच्या उद्योग केला आहे. थेट विद्युत रोहित्राजवळ असलेल्या खांबावर चढून स्वतःचा जीव धोक्यात घालत कॉपी पुरवण्यात आली. बीड शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याला रोख लावण्याचा प्रयत्न करत चोप दिला आहे

परीक्षा बोर्डाच्या 160 विद्यार्थ्यांना फटका

दुसरीकडे, नागपूर जिल्ह्यात 12वीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी बोर्डाच्या कारभाराने 160 विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. यात 400 आसनव्यस्थेची क्षमता असलेल्या ठवरे महाविद्यालयात 560 विद्यर्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.  यातील मुख्य परीक्षा केंद्रावर जागा नसल्याने 160 अतिरिक्त विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपकेंद्र  दिले गेले. मात्र याची विद्यार्थ्यांना कल्पनाच नव्हती. 10 वाजता परीक्षा केंद्रवार पोहचल्यानंतर बाजूला असलेली न्यू अपोप्सटोलीक शाळा हे 160 विद्यार्थ्यांचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मनस्थाप सहन करावा लागला. नंतर यात परीक्षा बोर्डाची चूक असल्याचे लक्षात आले.

अशाप्रकारे आपण पाहिलं की दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत असताना काही धक्कादायक बातम्या विद्यार्थ्यांसाठी येत आहेत तरी सर्व दहावी-बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी आपण या नंबरवर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment