WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat gas cylinder process आजपासून या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार पाहा पूर्ण प्रोसेस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mofat gas cylinder process आज आपण पाहणार आहोत की राज्यातील कोणत्या बहिणींना लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे पात्रता काय असेल अर्ज कसा करायचा या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत

Mofat gas cylinder process पूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील लाडक्या बहिणी असतील लाडक्या लेकी असतील या सर्वांसाठी राज्य सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहेत यामध्येच महिलांसाठी तुम्हाला सर्वांना माहिती अत्यंत कमी कालावधीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात प्रसिद्ध साले आणि या योजनेअंतर्गत राज्यातील माता-भगिनींना महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आता लाडक्या बहिणींना मोफत गॅस देखील सिलेंडर मिळणार आहे तो कसा आणि कोणाला मिळणार याची संपूर्ण विश्लेषक माहिती आपण पाहणार आहोत.

केंद्र सरकार ज्याप्रमाणे उज्वला योजनेच्या अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना त्याच कोणी देशातील लाडक्या बहिणींना सबसिडी देत आहे त्याचप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना मोफत तीन गॅस सिलेंडर हे राज्य सरकार अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत त्यांना मिळणार आहेत या योजनेचे पात्रता निकष काय आहेत हे बघुयात

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या
राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे व तसा शासन निर्णय केला आहे.

या योजनेचे पात्रता निकष

  • या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे.
  • एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल.
  • तसेच फक्त १४.२ किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल.

या योजनेची कार्यपद्धती

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत गॅस सिलिंडलचे वितरणही तेल कंपन्यामार्फत करण्यात येईल.
  • केंद्र सरकारच्या ३०० रुपये अनुदाना व्यतिरिक्त राज्य शासन ५३० रुपये प्रति सिलिंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांचा थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी यांना प्रति सिलिंडर ८३० रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येईल.

या योजनेत ग्राहकास एका महिन्यास एकापेक्षा जास्त सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही.

  • दि. १ जुलै २०२४ रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • दि. १ जुलै २०२४ नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत.
  • या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व लाभार्थी निवडीसाठी मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक,

प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी

पुरवठा, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल.

या दोन्ही समिती ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांचे (रेशन कार्डनुसार) कुटुंब निश्चित करेल. योजनेतील लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची काळजी घेईल. निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी, आधार संलग्न बँकखाते क्रमांकासह निश्चित करेल. याशिवाय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी व ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तरीय समितीही कार्यरत असणार आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील लाडक्या बहिणींना मोफत सिलेंडर कसे मिळणार यासाठी त्यांना अर्ज पात्रता काय असेल याची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या नंबर वर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Mofat gas cylinder process आजपासून या महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार पाहा पूर्ण प्रोसेस”

  1. माझे गॅस कनेक्शन गेली २० वर्ष माझ्या नावावर आहे.मी सर्व निकषाला पात्र आहे.बॅकैत आधारकार्ड लिंक केले आहे.तरीही मला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही.मुख्यमंत्रीसाहेबांना नम्र विनंती आहे की अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत वयाची अट शिथिल करावी.निराधार महिलांनाही कायमस्वरूपी रोजगार मिळावा.निराधार, अविवाहित महिलांनी काय करावे.

    Reply

Leave a Comment