WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC 17NO 2025 दहावी बारावी 17NO फॉर्म भरण्यासाठी सुरुवात आताच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC HSC 17NO 2025 आज आपण पाहणार आहोत की राज्यातील दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे मोठे बातमी समोर येत आहेत म्हणजे राज्यातील दहावी बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे हा फॉर्म भरण्यासाठी काय करावे लागेल कोणते कागद करा लागते याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत

SSC HSC 17NO 2025 संपूर्ण माहिती

राज्यातील दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे 17 नंबर फॉर्म हा भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे किती तारखेपर्यंत ही मुदत असणार आहे आणि आपल्याला हे काम कसा भरता येईल याविषयी संपूर्ण माहिती हवी आहे

SSC HSC 17NO 2025महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना 1 ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी बुधवारी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थी 17 नंबरचा अर्ज भरून, दहावी-बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होतात. त्याचप्रमाणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे, अनेक विद्यार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षण घेता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा देता यावी, यासाठी राज्य मंडळाकडून परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्याची संधी दिली जाते. त्यासाठी या विद्यार्थ्यांना 17 नंबरचा अर्ज आणि शुल्क भरावे लागते.

राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे संबंधित कालावधीतच निवडलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो जवळ ठेवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रत ई-मेल आयडीवर पाठवली जाणार आहे.

mahahsscboard.inया अर्जाची प्रिंट आउट, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र आदींची छायाप्रत प्रत्येकी दोन प्रतीत काढून ठेवावी, असे आवाहन कुलाळ यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना या संकेतस्थळावरील स्टूडंट कॉर्नर या पर्यायाचा वापर करण्याचे निर्देश राज्य मंडळाने दिले आहेत.

अर्जासाठी किती आहे शुल्क
दहावीसाठी शुल्क – 1100 रुपये शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क, विलंब शुल्क प्रती विद्यार्थी 100 रुपये
बारावीसाठी शुल्क – 1100 रुपये शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क, विलंब शुल्क प्रती विद्यार्थी 100 रुपये
शुल्क भरण्याची पद्धत – ऑनलाइन

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी 17 नंबरचा फॉर्म कशाप्रकारे भरता येईल याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा किंवा 9322515123 या क्रमांकावर फोन करा.

Leave a Comment