Shala college bus आज आपण पाहणार की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर बघूयात माहिती.
Shala college bus संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आता जून महिना सुरू आहे शाळा सुरू होणार आहेत शाळा सुरू झाल्यानंतर मुलांची जे व्यवस्था असते ती म्हणजे शाळा काही गावापासून लांब असतात त्यावेळेस त्यांना एसटीचा आधार घ्यावा लागतो आणि एसटीमध्ये त्यांना पैशांची अडचण असते त्यामुळे आता एसटी पास तुम्हाला काढायचा असेल तर ते एसटी पास संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर बघुयात की काय अपडेट आहे याविषयी माहिती
Shala college bus शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी बसचा पास घेण्यासाठी एसटी आगारात रांगेत उभे राहावे लागणार नाही. कारण परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना त्यांचा एसटी पास थेट शाळा आणि महाविद्यालयांमध्येच दिला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्यांना पास मिळवणे अधिक सोपे होणार आहे.
पास केंद्रांवर लांबच लांब रांगा
येत्या नवीन शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १६ जूनपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना घरापासून शाळेपर्यंत ये-जा करण्यासाठी शासनाने एसटी प्रवासात ६६.६६ टक्के इतकी सवलत दिली आहे. विद्यार्थ्यांना मासिक पास काढण्यासाठी केवळ ३३.३३% रक्कम भरावी लागते. शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. पण आतापर्यंत विद्यार्थ्यांना या पाससाठी एसटीच्या पास केंद्रांवर लांबच लांब रांगा लावाव्या लागत होत्या किंवा शाळांनी गट करून आगारात जाऊन पास घ्यावे लागत होते. मात्र आता त्रासातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
शाळा-महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार, एसटीचे कर्मचारी थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे पास देतील. यामुळे विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा शैक्षणिक वेळ वाया जाणार नाही, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एसटी पास थेट तुमच्या शाळेत
या संदर्भात १६ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना पत्र पाठवून नवीन वर्षातील विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरातील शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
अशाप्रकारे आपण पाहिलं की शाळा कॉलेज संदर्भात एसटी पास संदर्भात सरकारने कोणता निर्णय घेतला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा