WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

School time change शाळा कॉलेज सुरू होण्याच्या वेळ बदली

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

School time change शाळा कॉलेज सुरू होण्याच्या वेळेबाबत एक मोठे अपडेट आलेले आहे त्याचीच माहिती आपण आज घेणार आहोत विद्यार्थी पालकांसाठी शिक्षकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे जून महिना सुरू आहे आता शाळा लवकरच सुरू होणार आहे त्याबाबत एक मोठे अपडेट आलेली आहे वेळापत्रकात त्याचप्रमाणे वेळेत काही बदल झालेला याविषयी माहिती बघूयात.

School time change संपूर्ण माहिती

आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थी पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे शाळा कॉलेजच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेले आहे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास हा शाळेत आणि होत असतो त्यामुळे शाळेमध्ये सतर्क असतं सरकार आणि त्यांच्या सुरक्षा विषयी त्याच प्रमाणे त्यांच्या वेळेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत मागच्या काही दिवसापासून पालकांनी त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी देखील मुलांच्या शाळेबाबत एक वक्तव्य केलं होतं की मग लहान मुलांना व्यवस्थित झोप झाली पाहिजे त्यामुळे आता शाळेच्या वेळा बदलणार का नेमक्या किती वाजता शाळा सुरू होणार आणि किती वाजता सुटणार याविषयी आपण माहिती सविस्तर बघुयात.

School time change विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची  बातमी समोर आलीय. येत्या 16 जूनपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. तर शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसह पालकांनी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या आणि पुस्तकांची खरेदी देखील त्यांनी सुरू केली आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत  महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला असून आता सकाळी सात ऐवजी शाळा 9 वाजता सुरू होणार आहे.

शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्वापूर्ण निर्णय घेण्यात आलाय. येत्या 16 जूनपासून शैक्षणिक वर्ष 2025-26 ची सुरूवात होणार आहे. तर नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीलाच शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल होत आहे. आता नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळा सकाळी 7 ऐवजी 9 वाजता भरणार आहेत अन् सायंकाळी 4 वाजता सुटणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 ही आता नव्या वर्षात शाळेची वेळ असणार आहे.

नवं वेळापत्रक कसं राहील?
शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार परिपाठ सकाळी 9 वाजल्यापासून ते 9.25 पर्यंत राहिल. सुरूवातीचे 3 लेक्चर 9.25 ते 11.24 पर्यंत होतील. छोटी सुट्टी 11.25 पासून ते 11.35 पर्यंत 10 मिनिटांची असेल. नंतरचे दोन लेक्चर 11.35 ते 12.50 या वेळेत होतील. मधली सुट्टी 12.50 ते 1.20 वाजेपर्यंत होईल. त्यानंतर उर्वरित लेक्चर 1.30 ते 3.55 वाजेपर्यंत होतील. त्यानंतर शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वंदे मारतम होईल अन् शाळा सुटेल.

16 जूनला शाळेची घंटा वाजणार
राज्यात लवकरच शाळेची घंटा वाजणार आहे. शेवटचे काही दिवस उन्हाळी सुट्ट्या आहेत. त्या आता संपत आल्याने विद्यार्थी अन् पालकांना शाळेचे वेध लागले आहेत. राज्यात 16 जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाची पहिली घंटा वाजणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची शाळा 9 जून पासूनच सुरू झाली आहे. राज्यात 11 जिल्हे वगळून सगळीकडेच 16 जूनपासून शाळा सुरू होणार आहे. इतर विभागांच्या तुलनेत विदर्भात थोड्या उशिराने शाळा सुरू होणार आहेत.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शाळा कॉलेज यांच्या वेळा काय बदललेल्या आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम whatsapp वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment