Loan interest rate आज आपण पाहणार की राज्यातील कोणत्या बँकांनी होम लोन कार लोन पर्सनल लोन स्वस्त केलेले आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत नेमका किती व्याजदर केलेला आहे ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर बघूया त्या पाच बँकांविषयी माहिती संपूर्ण.
Loan interest rate संपूर्ण माहिती
आपण आपल्या कामासाठी कुठल्या ना कुठल्या बँकेतून लोन घेत असतो जर त्यासाठी घरासाठी वाहनासाठी किंवा पर्सनल लोन याचा वापर करत असतो मग त्याचा एम आय आपण भरत असतो परंतु नुकत्याच तुम्ही बघितला असेल की आरबीआयचे जे संचालक आहे त्यांनी आधी सांगितलं होतं की या वर्षी आम्ही रिपोर्टेट या महिन्यात कमी करणार आहोत रेपोरेट कमी झाला आणि व्याजदर कुठल्या बँकेने कमी झाले आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत तर जवळपास या पाच बँकांनी व्याजदर कमी केलेला आहे त्यामुळे ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी नेमका किती रेपोरेट कमी झालेल्या आणि व्याजदर कोणत्या बँकेने कमी केलेला याविषयी माहिती बघुयात.
Loan interest rate भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गेल्या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेत रेपो रेटमध्ये 0.5 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे सध्या रेपो रेट 5.5 टक्के आहे. यासोबतच रोख राखीव प्रमाण (CRR) मध्येही 1 टक्क्यांची कपात करण्यात आली.यानंतर आता देशातील अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि एमएसएमई लोन घेणाऱ्या ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.
सरकारी बँकांकडून दिलासा
युनियन बँक ऑफ इंडिया, केनरा बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) या तीन सरकारी बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात 0.50 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. या निर्णयामुळे कर्ज घेणे आता थोडे स्वस्त होणार असून सामान्य ग्राहकांचा हप्ता कमी होईल.
युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडियाने EBLR आणि RLLR दरात 0.50% ची कपात केली आहे. बँकेने स्पष्ट सांगितलं की, RBI ने रेपो रेट कमी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता युनियन बँकेच्या ग्राहकांना कमी व्याजदरावर कर्ज मिळणार आहे.
IOB नेही घटवले दर
इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देखील कर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्के कपात केली असून, त्यांचा RLLR (Repo Linked Lending Rate) दर 8.85% वरून 8.35% झाला आहे. बँकेच्या ALCO (Asset Liability Committee) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केनरा बँकेकडूनही दिलासा
केनरा बँकेने देखील RLLR दरात 0.50% कपात केली असून, ती आता 8.75% वरून 8.25% झाली आहे. हा नवीन व्याजदर बुधवारपासून लागू होणार आहेत.
यापूर्वी बँक ऑफ बडोदाने त्यांच्या RLLR मध्ये 0.50% कपात केली होती. एचडीएफसी बँकेने त्यांच्या MCLR दरात 0.10% पर्यंत कपात केली आहे, ज्याचा फायदा त्यांच्याकडून MCLR आधारित कर्ज घेतलेल्या ग्राहकांना होणार आहे.
विशेषज्ञांच्या मते, बँकांकडून कर्जावरील दरात झालेल्या या कपातीमुळे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांना आणि लघुउद्योगांना (MSME) मोठा दिलासा मिळेल. मासिक हप्ते कमी होतील आणि नव्याने कर्ज घेणाऱ्यांनाही फायदा होईल. RBI ने दर कपात केल्यामुळे आर्थिक चक्राला चालना मिळेल आणि सामान्य माणसाच्या खिशावरचा भार कमी होईल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या बँकेने व्याजदर कमी केलेले आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा