School summer vacation आज आपण पाहणार आहोत की शाळा कॉलेज शिक्षकांच्या उन्हाळी सुद्धा रद्द करण्यात आलेले आहेत तर कशामुळे रद्द करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे उन्हाळी सुट्टी कधी असणार आहे यामुळे विद्यार्थी पालकांमध्ये चिंता वाढलेली आहे त्याचप्रमाणे शिक्षक संघटना देखील यावर आक्रमक झालेले आहेत तरी याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती आज पाहिजे आहे.
School summer vacation पूर्ण माहिती
यावर्षी शाळा कॉलेजमध्ये काही महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जसं की आता पहिली ते नववी मध्ये जे आहे प्रत्येक राज्यामध्ये आपल्या शाळेमध्ये एकाच वेळेस पेपर होतील जसं की 8 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत या परीक्षा घेण्यात येणार आहेत त्यामुळे शाळा कॉलेज चालूच ठेवावे लागतील आणि सुट्ट्यांचे देखील वेळापत्रक बदललेला आहे महाराष्ट्रात आता यावर्षी पहिले पासून सीबीएससी बोर्ड लागू होणार आहे त्याच्यामुळे शिक्षकांना ट्रेनिंग भेटणार आहे शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या रद्द होणार आहेत निकाल लवकर लावण्याचा देखील सांगितलेलं आहे एक मे ला लावायचा आहे अशाप्रकारे शाळा कॉलेजच्या सुट्ट्या कधी असणार आहे त्याची माहिती आपण बघूयात
School summer vacation जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे. तसेच दर आठवड्यातील विद्यार्थ्यांचे प्रगतीचे मूल्यांकन करून ३० जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि संख्याशात्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच यंदा त्यांना उन्हाळ्याची सुट्टी उपभोगता येणार नाही.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी करण निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यंदा सुट्टीतही शिक्षकांना विद्याथ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन करावे लागणार आहे.
या उपक्रमातील राज्यातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के भाषा आणि अध्ययन क्षमता परिपूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अनुदानित, खाजगी प्राथमिक, अनुदानित अंशतः अनुदानित या शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा करण्यात आला असून सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे.
हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात ५ मार्च ते ३० जून या चार महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार असून यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यातही शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे द्यावे लागणार असून अभ्यासाला सुट्टी मिळणार नाही. हा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत ऑफलाईन अथवा ऑनलाईन अध्यापन करावे लागणार आहे.
निपुण भारत उपक्रमात प्रगत होणाऱ्या विद्यार्थ्यांची क्षमता व प्रगती तपासण्यासाठी चावडी वाचन व गणन कार्यक्रम करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभाग पातळीवरून देण्यात आलेले आहेत. हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी अचानक जिल्हाभरातील सर्व शाळांना भेटी देत, या उपक्रमाच्या तयारीची माहिती तपासली. तसेच पुढील काळात सातात्यानेही तपासणी जिल्हा परिषद पातळीवरून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
निपुण भारत उपक्रमात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिलेल्या विहित कालावधीत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळा अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. उपक्रमात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीलाही सहभागी करून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की शाळा कॉलेजच्या या वर्षी शिक्षकांच्या सुट्टया रद्द झालेले आहेत आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा