SBI Har Ghar Lakhpati आज आपण पाहणार आहोत की एसबीआय मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत या स्कीम मध्ये हर घर लखपती या योजनेमध्ये आपल्याला कशाप्रकारे चांगला मोबदला मिळेल आणि आपल्याला लाख रुपये कसे मिळतील किती रुपये पासून गुंतवणूक करता येते आणि कधी मिळतील याचीच माहिती आपण घेणार आहोत
SBI Har Ghar Lakhpati पूर्ण माहिती
देशातील प्रत्येक नागरिकला ही पैशांची गरज असते आणि त्या पैशांच्या गरजेसाठी तो आपली सेविंग करत असतो परंतु ती सेविंग योग्य दिशेने योग्य ठिकाणी झाली तर त्याला त्याचा चांगला मोबदला मिळत असतो भारताचे सर्व चित्र बँक स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये सेविंग करण्यासाठी सुरक्षितता आणि त्याचप्रमाणे सर्वच चांगले वेगळे प्रकारच्या योजना आहेत यामध्येच हर घर लखपती या योजनेमध्ये आपल्याला चांगला मोबदला मिळतो याच्यात आपण किती गुंतवणूक करायची पाहुयात
SBI Har Ghar Lakhpati देशातील सर्वात माेठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने हर घर लखपती नावाची एक नवीन आवर्ती ठेव (RD) योजना सुरू केली आहे. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे ज्यांना दरमहा त्यांच्या पगारातून थोडी बचत करून मोठा निधी निर्माण करायचा आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम सहजपणे उभारू शकता.
SBI Har Ghar Lakhpati लाभ कोठे मिळेल
हर घर लखपती योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या एसबीआय शाखेत जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. यावेळी मॅच्युरिटी रक्कम आणि गुंतवणुकीचा कालावधी निवडावा लागेल. याच्या आधारे मासिक हप्ता ठरवला जाईल.
तुम्ही या योजनेत कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावे स्वतंत्र गुंतवणूक करू शकता आणि निर्धारित कालावधीनंतर चांगली एकरकमी रक्कम जमा करू शकता. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ठेव मर्यादेवर कोणतीही मर्यादा नाही. हर घर लखपती ही एक आवर्ती ठेव योजना असून या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दरमहा लहान बचत करून लोकांना एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक निधी उभारण्यासाठी प्रेरित करण्याचा आहे.
एसबीआयच्या या योजनेत गुंतवणूकदार ३ ते १० वर्षांच्या लवचिक कालावधीसाठी मासिक बचत करू शकतात. याेजनेत ३ वर्षांसाठी दरमहा २५०० जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर १ लाख मिळतील. तर १० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर मासिक हप्ता ५९१ पर्यंत कमी होईल. योजनेच्या सुरुवातीला मासिक ईएमआय आणि व्याजदर निश्चित केले जातात.
व्याजदर आणि फायदे
- सामान्य ग्राहकांसाठी व्याजदर ६.७५ टक्क्यांपर्यंत आहे.
- ज्येष्ठ नागरिकांना ७.२५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते.
- एसबीआय कर्मचारी आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना ८ टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळतो.
- आयकर नियमांनुसार या योजनेवर टीडीएस देखील लागू आहे.
मुले देखील खाते उघडू शकतात
स्वाक्षरी करता येणारी १० वर्षे आणि त्याहून अधिक वयाची मुले देखील या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ज्या मुलांना स्वाक्षरी करता येत नाही त्यांच्यासाठी पालक किंवा पालकांसह खाते उघडता येते
एसबीआयच्या हर घर लखपती या योजनेमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत आपल्याला गुंतवणूक करता येते जवळपास दहा वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत आणि ज्येष्ठ नागरिक साठ वर्षे याच्यावरती जे असतील ते देखील याच्यात गुंतवणूक करू शकतात
लवचिकता आणि दंड
हर घर लखपती योजनेत आंशिक हप्ते जमा करण्याची सुविधा आहे. परंतु हप्त्यांना विलंब झाल्यास दंड आहे. १०० रुपयांच्या हप्त्यावर १.५० ते २ रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. सलग ६ हप्ते जमा झाले नाहीत तर खाते बंद केले जाईल आणि उर्वरित रक्कम बचत खात्यात हस्तांतरित केली जाईल.
उशिरा पैसे झाला तर दंड आकारला जाईल
एसबीआय हर घर लखपती योजनेअंतर्गत मुदत ठेवींमधील गुंतवणूक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी उशिरा पैसे भरल्यास दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच, मुदतपूर्व पैसे काढल्यासही दंड आकारला जाईल पण चांगला व्याजदर, हमी परतावा आणि भांडवल सुरक्षितता देणाऱ्या या ठेव योजनेत आर्थिक शिस्त राखण्यासाठी असा दंड वाईट नाही.
व्याजदर आणि वयाची अट
तीन ते दहा वर्षाच्या ठेव योजनेचा व्याजदर ६.७५ टक्के ते ७.२५ टक्के आहेत तर दहा वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती या योजनेत इन्व्हेस्ट करून खाते उघडू शकते. १० ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तीला गुंतवणुकीवर ६.७५ टक्के व्याजाचा लाभ मिळेल तर ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तीला ७.२५ टक्के दराने व्याज दिला जाईल.
वरील लेखनात आपण पाहिले की एसबीआयच्या हरघर लखपती योजनेची पूर्ण माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा