Repo rate today आज आपण पाहणार आहोत की घर आणि गाडी खरेदी करण्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही नेमकी ही आनंदाची बातमी कुठली आहे आणि काय संदर्भ आहे असं आपल्याला काही फायदा होणार आहे तुम्ही जर घर आणि गाडी घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे तर बघुयात याविषयी संपूर्ण माहिती.
Repo rate today संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे घर आणि गाडी कमी खरेदी करणार असताल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे प्रत्येकाचे एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं हक्काचं घर असावे या घर बांधण्यासाठी आपल्याला आर्थिक अडचणी असतात या आर्थिक अडचणी आता तुम्ही बँकेतून लोन करत असतात पतपेढीतून लोन करतात किंवा आपण पुन्हा नातेवाईकडून आपले पैसे घेत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही घर आणि गाडी घेणार असाल तर सरकारकडून बँकेकडून तुम्हाला काही फायदा होणार आहे याविषयीचा पण आज माहिती पाहणार आहोत
Repo rate today रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी सलग दोन वेळा रेपो रेटमध्ये कपात केली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. दोन्ही वेळा प्रत्येकी 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली. यामुळं रेपो रेट 6.50 वरुन आता 6.00 टक्क्यांवर आला आहे. याचा फायदा गृहकर्जदारांना झाला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक 4,5,6 जूनला होणार आहे. म्हणजेच 6 जूनला रेपो रेटची घोषणा करण्यात येईल.
25 बेसिस पॉईंट रेपो रेट घटणार?
आरबीआयच्या जून महिन्यातील पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो ,असा अंदाज अर्थतज्ज्ञांना आहे. किरकोळ महागाई सलग दोन महिन्यात 4 टक्क्यांच्या खाली राहिल्यानं रेपो रेट 25 बेसिस पॉईंटनं कमी केला जाऊ शकतो, अशी आशा आहे. यासंदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्ड या इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यास तो 5.75 टक्क्यांवर येऊ शकतो.
एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईचा दर गेल्या सहा वर्षात निचांकी पातळीवर आहे. एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईचा दर 3.16 टक्के आहे. खाद्य पदार्थ महागाईचा दर ऑक्टोबर 2021 पासून पहिल्यांदा निचांकी पातळीवर आहे. डाळ आणि धान्याच्या किमती घटल्या आहेत. मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळं सर्व परिस्थितीचा विचार करता रेपो रेटमध्ये कपात केली जाऊ शकते.
नोमुराच्या एका रिपोर्टनुसार 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत महागाईचा दर 3 टक्क्यांच्या खाली राहू शकतो. तर, दुसऱ्या सहामाहीत तो 3.34 टक्के राहू शकतो. आरबीआयच्या नियमानुसार महागाईचा दर 4 टक्क्यांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. आरबीआयकडून 2025-26 मध्ये अजून 5 वेळा पतधोरण जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं रेपो रेट 5 टक्क्यांवर येऊ शकतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एप्रिल 2025 मध्ये पतधोरण जाहीर करताना सर्वसमावेशक धोरण ठेवलं होतं. त्यावेळी रिजर्व्ह बँक ऑफ इंडियानं महागाई कमी करण्याऐवजी विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका ठेवली होती.
रेपो रेट कमी झाल्यास गृहकर्जदारांना फायदा
आरबीआयकडून जेव्हा रेपो रेट कमी केला जातो तेव्हा गृह कर्ज आणि वाहन कर्जधारकांना फायदा होतो. बँकांकडून गृह कर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात केली जाते. याचा फायदा नव्यानं कर्ज घेणाऱ्यांना होतो किंवा ज्यांनी कर्ज रेपो रेट प्रमाणं बदलणाऱ्या व्याज दरावर घेतलेलं आहे, त्यांना देखील याचा फायदा होतो.
अशाप्रकारे आपण पाहिलं की घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण बघितली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा