WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card ekyc mobile रेशनकार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration card ekyc mobile आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्ड धारकांसाठी कोणती मोठी आनंदाची बातमी आहे आणि सरकारने कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे याबद्दल आपण संपूर्ण विश्लेषित माहिती पाहणार आहोत

Ration card ekyc mobile पूर्ण माहिती

देशभरातील त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरीत आहे रेशन कार्ड हा आपला एक महत्त्वाचा पुरावा आहे रेशन कार्ड वर फक्त पुरावा म्हणून ओळखणे तर आपल्याला त्या ठिकाणी मोफत धान्य देखील मिळत असतं गोरगरिबांना याचा मोठा फायदा होत असतो माननीय पतप्रधान यांनी कोरोना काळात मोफत अन्नधान्य योजना राबवली या अंतर्गत राज्यातील गरीब नागरिकांना गहू आणि तांदूळ हे मोफत मिळत असतात परंतु आता रेशन कार्ड धारकांसाठी सरकारने आणखीन एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांमध्ये आनंदाची वातावरण आहे

रेशन कार्ड धारकांमध्ये आपल्याला जर सवलती घ्यायच्या असतील आपल्याला मोफत अन्नधान्य घ्यायचा असेल तर आपल्याला ई केवायसी करणं हे गरजेचं असतं केवायसी करण्यासाठी राशन कार्डवर भरपूर गर्दी असते आणि भरपूर वेळ देखील लागतो मग काही नागरिकांना ही केवायसी करणं शक्य नसतं आता सरकारने अशा नागरिकांसाठी ॲप ओपन केलेला आहे ते ॲप डाऊनलोड करून तुम्ही घरबसल्या मोबाईलवर आपले इ केवायसी करू शकता

Ration card ekyc mobile शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केले जात आहे, परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत.

या पार्श्वभूमीवर शासनाने मेरा ई-केवायसी अॅप कार्यरत केले आहे. आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करता येणार आहे

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी घरबसल्या काही मिनिटांतच आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. राज्य सरकारने NIC च्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी Mera E-KYC हे अॅप सुरू केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करता येईल.

मुख्य वैशिष्ट्ये

१) घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा.

२) फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी.

३) रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो.

४) आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक

ई-केवायसी कशी करावी? (Step-by-Step मार्गदर्शन)

१) प्ले स्टोअरवरून खालील दोन अॅप डाउनलोड

करा.

अ) Mera E-KYC Mobile App खालील

ब) Aadhaar Face RD Service App

२) अॅप इन्स्टॉल करून सेटअप करा. दोन्ही अॅप इन्स्टॉल करा आणि आवश्यक परवानग्या द्या.

३) Mera E-KYC अॅप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.

– राज्य : महाराष्ट्र निवडा.

– आधार क्रमांक टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.

• कॅप्चर : दिलेल्या कोडची नोंद करा.

४) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)

– स्वतः साठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन

करा. – स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा.

– दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा.

५) सत्यापन पूर्ण

– यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल. – याची खात्री करण्यासाठी अॅपमध्ये “E-KYC Status” तपासा.

– जर “E-KYC Status – Y” दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.अत्यंत महत्त्वाचे

– ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

– महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा.

शेवटची तारीख : ३१ मार्च २०२५ (परंतु २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी).

रास्त भाव दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना

अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये.

अशाप्रकारे आपण पाहिलं की रेशन कार्ड धारकांसाठी कोणती महत्त्वाची आनंदाची बातमी आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स हवे असतील 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment