PM ROJGAR SCHEME आज आपण पाहणार आहोत की राज्य सरकार केंद्र सरकार नेहमी तरुणांसाठी वेगवेगळे योजना आणत असतो यामध्ये आजार पाहणार आहोत की आपण तरुणांना व्यवसाय करण्यासाठी जवळपास केंद्र सरकार 50 लाख रुपये देणार आहे यासाठी त्यांना अर्ज कसा करायचा पात्रता असेल कागदपत्र कोणते लागतील याविषयी आपणास माहिती बघणार आहोत.
PM ROJGAR SCHEME संपूर्ण माहिती
राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकारची पंतप्रधान बेरोजगार योजनेअंतर्गत तुम्हाला 50 लाख रुपये मिळू शकतात ही 50 लाख रुपये घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता आणि त्याच्यात आर्थिक तुमचं उत्पन्न सुरू होऊ शकतं या नेमकं हे पन्नास लाख रुपये कसे मिळणार कोणाला मिळणार आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल आणि नेमके सरकारचे नियम आणि अधिक काय आहेत याविषयी आपण आज माहिती पाहूया
PM ROJGAR SCHEME रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत २००८ पासून सुरु करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश भारतातील बेरोजगार तरुणांना व महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे.
विशेषतः ग्रामीण भागातील व शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय घटकांमध्ये उद्योजकता वाढवून रोजगार निर्मिती करणे, हा योजनेचा मुख्य हेतू आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना दोन जुन्या योजनांना एकत्र करून तयार करण्यात आली आहे — पंतप्रधान रोजगार योजना (PMRY) आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना (REGP). या योजनेंतर्गत गावाकडे खादी ग्रामोद्योग आयोग व खादी ग्रामोद्योग मंडळ आणि शहरात जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अंमलबजावणी केली जाते.
या योजनेचे स्वरूप
या योजनेच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती, ज्याचे वय किमान १८ वर्षे पूर्ण झाले आहे, आपला व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज व अनुदान मिळवू शकते. विशेष बाब म्हणजे, या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही.
उमेदवार सामान्य गटातील असेल, तर त्याला ग्रामीण भागात २५% व शहरी भागात १५% इतके अनुदान मिळते. तर अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिलांना आणि अपंग व्यक्तींना ग्रामीण भागात ३५% आणि शहरी भागात २५% पर्यंत अनुदान दिले जाते.हे अनुदान मार्जिन मनी स्वरूपात दिले जाते आणि ते थेट बँकेत तीन वर्षे ठेवले जाते. त्यानंतर लाभार्थीने व्यवसाय व्यवस्थित सुरू ठेवल्याचे खात्री झाल्यावर ते अनुदान त्याच्या कर्ज खात्यात वर्ग केले जाते.
अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, ८वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (५ लाखांवरील प्रकल्पासाठी), जात प्रमाणपत्र, भाडे करार किंवा जागेची मालकीची कागदपत्रे, प्रकल्प अहवाल, विजबिल, व्यवसाय परवाना अशी विविध कागदपत्रे आवश्यक असतात.
अर्जदाराने योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी kviconline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागतो. अर्ज केल्यानंतर संबंधित यंत्रणा अर्जाचा आढावा घेते आणि बँकेकडे शिफारस करते.
या योजनेअंतर्गत मिळणारा फायदा
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५० लाख रुपये पर्यंत कर्ज घेता येते. त्यामध्ये उत्पादन व्यवसायासाठी २५ लाख रुपये व सेवा व्यवसायासाठी १० लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे. उर्वरित ५ ते १०% रक्कम लाभार्थ्याला स्वतःकडून गुंतवावी लागते. उर्वरित भाग बँक कर्ज म्हणून मंजूर करते. कर्जाचा परतफेड कालावधी ३ ते ७ वर्षांपर्यंत असतो आणि कर्जाच्या रकमेवर लागणारे व्याजदर बँकेच्या चालू दराप्रमाणे ठरवले जातात.
महत्त्वाचे म्हणजे, कर्ज मंजुरीनंतर लाभार्थ्याला कोणत्याही संस्थेतून उद्योजकीय प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरच पहिला हप्ता मिळतो. त्यानंतर नोडल बँकेकडून मार्जिन मनी (अनुदान) पाठवले जाते. ही योजना खास करून अशा व्यक्तींना उपयोगी पडते जे पारंपरिक रोजगाराच्या संधींपासून वंचित राहतात.
या योजनेद्वारे कोणत्या व्यवसायाला मिळते कर्ज?
या योजनेद्वारे अनेक प्रकारच्या व्यवसायांना कर्ज मिळू शकते, जसे की कृषी आधारित अन्नप्रक्रिया उद्योग, खनिज आधारित उत्पादने, हस्तकला व कागद उद्योग, केमिकल उत्पादने, सेवा व्यवसाय, वस्त्रोद्योग, वन-आधारित उत्पादने, बायोटेक प्रकल्प आणि ग्रामीण अभियांत्रिकी यासारख्या उद्योगांवर भर दिला जातो.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही बेरोजगार तरुण, महिला आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी संधी देणारी योजना आहे. कमी व्याजदरावर सहज कर्ज, अनुदानाची मदत आणि प्रशिक्षणाची सुविधा यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी उद्योजक बनणे सोपे झाले आहे. त्यामुळे जर तुम्हीही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील तरुणांना 50 लाख रुपये हे कसे मिळतील या सर्व विषयाची माहिती आपण पाहिले आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा