PM Gharkul Yojana 2025 आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला देशभरातील नागरिकांना आता घर मिळणार आहे त्यासाठी सरकारने कोणती योजना लागू केलेली आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल निकष काय असेल आणि हे घर कोणाला मिळणार बघूयात संपूर्ण विश्लेषित माहिती
PM Gharkul Yojana 2025 पूर्ण माहिती
देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे आणि मोठे आनंदाची बातमी येत आहे प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत देशभरातील नागरिकांना मोफत दर मिळणार आहे या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेले आहेत हे अपडेट मध्ये सांगितलेला आहे की किती घरकुल मंजूर झालेले आहेत त्याचप्रमाणे आता वाढीव रक्कम देखील त्यांना मिळणार आहे त्यामुळे देशभरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आहे बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती
PM Gharkul Yojana 2025पंतप्रधान ग्रामीण आवास योजना (PM Awas Yojana) या योजनेत साधारण ०१ लाख २० हजार रुपयांचा निधी देण्यात येतो, मागील सात वर्षात या निधीत वाढ झाली नसल्याची लाभार्थ्यांची तक्रार आहे. त्या अनुषंगाने या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे यापूर्वी मिळणाऱ्या अनुदानात (Gharkul Yojana Anudan) वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेचा महाराष्ट्राला (Gharkul Yojana Installment) वीस लाख घरांचा उद्दिष्ट मिळाले आहे. देशातल्या आजपर्यंतच्या योजनेपैकी सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. मागील ४५ दिवसात १०० टक्के घरांना मान्यता देण्यात यश आले आहे आणि जवळजवळ दहा लाख ३४ हजार घरांना पहिला हप्ता देखील वितरित करण्यात आल्याचे आहे. उर्वरित दहा लाख घरांना देखील येत्या काही दिवसात पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे. ही प्रक्रिया असली तरी हे त्या वर्षभरातच २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचे लक्ष असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
45 दिवसात आम्ही 100 टक्के घरांना मान्यता दिली
महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात मोठं घरकुलांचं उद्दीष्ट मिळालं आहे. 20 लाख घरांचे उद्दीष्ट राज्याला मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता असे जयकुमार गोरे म्हणाले. 100 दिवसांचा जो कार्यक्रम दिला होता, त्यामध्ये पहिल्या 45 दिवसात आम्ही 100 टक्के घरांना मान्यता दिली आहे. यामध्ये आम्ही 10 लाख 34 हजार घरांना पहिला हप्ता देखील आपण वितरीत केला असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले.
येणाऱ्या 15 दिवसात राहिलेल्या 10 लाख घरांना आम्ही हप्ता देऊन काम सुरु करणार असल्याचे गोरे म्हणाले. वर्षभरात आम्ही 20 लाख घरकुले बांधणार असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले. 100 टक्के रिझल्ट यावा असे काम सुरु केले आहे. सगळ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या असल्याचे गोरे म्हणाले. घरांच्या किंमतीमध्ये ग्रामीण भागात वाढ करण्यात आऐली आहे. आम्ही जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या माध्यमातून घरकुलासाठी दिलं जाणरे अनुदानाबाबत वेळोवेळी नाराजी जाहीर केले जाते. याच पार्श्वभूमीवर वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. राज्यामध्ये २० लाख नवीन घरकुलाला मंजुरी देण्यात आली असून घरकुलाचा पहिला हफ्ता वितरण करण्यात आला आहे. परंतु हे सर्व होत असताना घरकुलाचं जे अनुदान आहे, या अनुदानामध्ये घरकुलाची काम पूर्ण करणं हे शक्य होत नसल्यामुळे बरेच घरकुलाची काम रखडले जातात. हे वेळेत पूर्ण होत नाहीत, परिणामी उद्दिष्ट पूर्ण होत नाही. या अनुषंगाने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
आगामी अर्थसंकल्पात तरतूद
आगामी अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असून तशी घोषणा देखील केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्या भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी जागा नाही. अशा लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांच्या ऐवजी एक लाख रुपयांचे अनुदान करण्यात आलेले आहे. तर शबरी आवास योजनेचे अंतर्गत अडीच लाखापर्यंत अनुदान देण्यात येते. याच पार्श्वभूमी राहता प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत दोन लाख दहा हजारापर्यंत अनुदान देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.
तर आता आपण पाहिलं की घरकुल ज्या लोकांना भेटलेला आहे त्यांच्यासाठी किंवा येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेत आता तुम्हाला वाढीव रक्कम घर बांधण्यासाठी मिळणार आहे एक मोठी आनंदाची बातमी तर आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोर वरून डाउनलोड करा
गावठाण मधील गायराण जागेवर घरकुल बांधकाम मंजुरी मिळावी 10 वर्षे पासुन घरकुल बांधायला अडचणी येत आहेत