WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM AVAS YOJANA केंद्र सरकारकडून सर्वांना मोफत घर मिळणार आजपासून अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM AVAS YOJANA आज आपण पाहणार आहोत की केंद्र सरकारकडून आता सर्वांना मोफत घर मिळणार आहे यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा ऑनलाइन करायचं किंवा ऑनलाईन करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील याविषयी आपणास संपूर्ण माहिती बघणार आहोत.

PM AVAS YOJANA संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आज आपल्याला प्रत्येकाला आजच्या जीवनामध्ये हक्काचे स्वतःचे घर लागतं परंतु या घर बांधण्यात किंवा घर विकत घेण्यामध्ये आपल्याला सर्वात मोठी एक अडचण असते ती म्हणजे आपल्याला पैशाची अडचण असते आता तुम्हाला माहिती आहे का केंद्र सरकारची योजना आहे योजनेद्वारे तुम्हाला स्वतःचा हक्काचं घर मिळू शकतो हो हे खर आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळतील आणि त्या पैशाचा उपयोग करून तुम्ही स्वतःच घर बांधू शकता नेमकी कोणती योजना आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे कागदपत्र काय लागतील याची संपूर्ण विश्लेषित माहिती आपल्याला घ्यायची आहे

PM AVAS YOJANA पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजने’साठी (PMAY) अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. या घोषणेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील लाखो आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांना आता परवडणाऱ्या दरात कायमस्वरूपी घर मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे.

मुदत कधीपर्यंत वाढवली?
जर तुम्ही अजूनही कोणत्याही कारणास्तव प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केला नसेल, तर आता तुमच्याकडे ३० डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे! सरकारने शहरी (PMAY-U) आणि ग्रामीण (PMAY-G) दोन्ही योजनांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
अधिकृत आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९२.६१ लाखांहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत. PMAY-U अंतर्गत, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी सरकारकडून २.५ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोण पात्र आहे?
अर्जदार भारताचा नागरिक असावा.
त्याच्या नावावर देशात कुठेही स्वतःचे पक्के घर नसावे.
ग्रामीण भागासाठी: कुटुंबाचे मासिक उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा कमी असावे. लाभार्थींची निवड सामाजिक-आर्थिक जात जनगणना (SECC-2011) च्या आधारे केली जाईल.
शहरी भागासाठी:
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असावे.
कमी उत्पन्न गटासाठी (LIG) वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असावे.
मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत असावे.
या योजनेत EWS आणि LIG गटातील महिला, विशेषतः विधवा महिला, तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि अल्पसंख्याक समुदायातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
रिक्षाचालक, रस्त्यावरील विक्रेते, रोजंदारीवर काम करणारे कामगार, औद्योगिक कामगार आणि स्थलांतरित कामगार यांचाही या योजनेत समावेश होऊ शकतो.

अर्ज कसा करायचा?
सर्वात आधी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर (PMAY च्या पोर्टलवर) जा.
होमपेजवरील ‘Citizen Assessment’ या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या परिस्थितीनुसार ड्रॉपडाउन मेनूमधून योग्य पर्याय निवडा (उदा. तुम्ही झोपडपट्टीत राहणारे असाल किंवा इतर कोणत्या गटात येत असाल).
आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचे नाव आणि आधार कार्ड क्रमांक भरावा लागेल.
‘चेक’ बटणावर क्लिक करून तुमचा आधार पडताळणी करा.
त्यानंतर नोंदणी फॉर्ममधील सर्व आवश्यक माहिती (जसे की पत्ता, कुटुंबाची माहिती इ.) काळजीपूर्वक भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
कॅप्चा कोड भरा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
वाचा – गुंतवणूकदारांसाठी ‘डिव्हिडंड’चा डबल धमाका! BEL, DLF सह ‘या’ कंपन्या देणार छप्परफाड लाभांश

कोणती कागदपत्रे लागतील?
आधार कार्ड
मोबाईल नंबर
उत्पन्न प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक खात्याचा तपशील (पासबुकची प्रत)
रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यासारखे कोणतेही ओळखपत्र

अशाप्रकारे आपण पाहिलं की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपल्याला हक्काचे स्वतःचे घर कशाप्रकारे मिळेल याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment