Pik vima yojana आज आपण पाहणार आहोत की एक रुपयात पिक विमा योजना ही राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती यामुळे शेतकऱ्यांना याचा भरपूर लाभ होत होता तर म्हणतो आता एका समिती ने शिफारस केली आहे की राज्य सरकारकडे एक रुपया पिक विमा योजना बंद व्हावी त्यामुळे नेमके ही योजना खरच नोंदवणार का यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसणार का याचेच माहिती आपण पाहणार आहोत
Pik vima yojana पूर्ण माहिती
Pik vima yojana राज्यात शिवसेना भाजप महायुतीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात एक रुपयात पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. 2023-24 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करुन त्या योजनेची अमंलबजावणी सुरु करण्यात आली
राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी १ रुपयांत पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं राज्य सरकारला अहवाल दिला आहे. या अहवालात शेतकऱ्यांना पीकविमा योजनेसाठी एक रुपयांऐवजी १०० रुपये शुल्क आकारावं, अशी शिफारस समितीनं केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या शिफारशीचा स्वीकार करणार का, ते पाहावं लागेल.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महायुती सरकार आलं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने १ रुपयात पीक विमा योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली. त्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकारकडून भरू लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा मिळू लागला. परंतु या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सुरुवातीपासूनच केला जात होता.
एक रुपया पिक विमा बंद होण्याचं महत्त्वाचा आणि मोठं कारण म्हणजे यामध्ये कृषी खात्यात होणारा एक रुपया पिक विमा च्या मागे असणारा भ्रष्टाचार असे बोलले जात आहेत सध्या तुम्ही बघितलं असेल की भाजप आमदार सुरेश धस यांनी पुराव्यासोबत काही पिक विमाचे घोटाळे समोर आलेले आहेत यामुळे हा निर्णय होण्याची शक्यता आहे
सीएससी केंद्रांना लाभ
बीड जिल्ह्यातील सीएससी केंद्रांवरुन बीड, धाराशिव, परभणी, नांदेड जिल्ह्यातील पीक विम्याचे अर्ज दाखल करण्यात आले होते. या योजनेत सीएससी केंद्र चालकांना 40 रुपयांची रक्कम मिळत होती. त्यामुळं या योजनेचा अधिक लाभ सीएससी केंद्र चालकांना झाल्याचं समोर आलं होतं. बोगस अर्ज भरणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे.
Pik vima yojana पिक विमा मोठा घोटाळा
एक रुपयात पिकविमा योजनेता मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. ओडिशातदेखील या योजनेच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला होता.त्याच पार्श्वभूमीवर ही योजना बंद केली होती. १ रुपयांत विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अनेक अर्ज भरले आहेत. त्यामुळेच गैरव्यव्हार झाला आहे.
त्यामुळे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये या योजनेत सुधारणासाठी इतर पर्यायांचा विचार करण्यासंबंधी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली होती. या समितीला अन्य राज्यातील पीकविमा योजनेचा अभ्यास करण्यासह योजनेची अंमलबजावणी आदि बाबीचा अभ्यास करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या. त्यानुसार अभ्यास समितीने अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे.
वरील लेखनात आपण एक रुपया पिक विमा योजना बंद होणार का याची माहिती घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.