News St mahamandal आज आपण पाहणार की एसटी प्रवेशनासाठी कोणते आनंदाची बातमी आहे महामंडळाने कोणता निर्णय घेतलेला आहे यामुळे एसटी प्रवाशांसाठी हा प्रवास सुखकर ठरणार आहे याविषयी आपणास माहिती पाहणार आहोत एस टी महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांकडून देखील कौतुक करण्यात आलेला आहे तर बघुयात समोर पूर्ण विश्लेषण माहिती
News St mahamandal संपूर्ण माहिती
राज्यातील लाल परी म्हणून ओळखले असलेले आपली एसटी महामंडळ आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक गावाला जोडणारे सर्वात सुरक्षित प्रवास देणारी सर्वांच्या आवडीचा प्रवेश देणारे म्हणजे आपली लाल परी आता या लाल परिवहन एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे आता प्रवाशांसाठी प्रवास सुकर होणार आहे नेमका हा कोणता निर्णय आहे त्याच्यामुळे घेण्यात आलेला आहे तर बघा आजच्या युगामध्ये जो सगळीकडे प्रदूषण कमी होणे प्रदूषण कमी झाल्यावर पर्यावरणाचे हानी कमी होते प्रदूषण होण्याचे भरपूर काही कारण आहे त्याच्यामध्ये वाहन जे आहे त्याच्यातून वायू प्रदूषण होत असतो त्यामुळे आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व इलेक्ट्रिकल बसले खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागात आणि शहरी भागात देखील बस धावणार आहेत आणि त्या इलेक्ट्रिकल बस मध्ये एसी असणार आहे म्हणजे आता ग्रामीण भागातल्या लोकांना देखील प्रवास हा करता करता त्यांना गारवा देखील मिळणार आहे हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणखीन याच्यात काय बदल आहेत किती आणि कोणते बघुयात या बसेस येणार आहेत संपूर्ण माहिती.
News St mahamandal राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता आगामी काळात ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक एसटी बस धावणार आहे. यासाठी पुढील २ वर्षात ५ हजार इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे इंधनावर होणारा खर्च कमी होणार आहे, तसेच पर्यावरणाचीही हानी कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महामंडळाचा मोठा निर्णय
समोर आलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाच्या अनेक आगारातील बस कालबाह्य झालेल्या आहेत, यातील काही बस नादुरुस्त असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून या बस खरेदी केल्या जाणार आहेत. पुढील २ वर्षात ५ हजार इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकांनाही इलेक्ट्रिक बसने प्रवास करता येणार आहे.
२ वर्षांत ५ हजार बस ताफ्यात दाखल होणार
एसटी महामंडळाने गेल्या वर्षी ५,१५० एसी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मार्च २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत फक्त २२० बस पुरविल्या होत्या, त्यामुळे कंपनीला इशारा पत्र देण्यात आले होते. आता कंपनीला बस पुरविण्याचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार, २०२५ मध्ये ६२० बस, २०२६ वर्षात २१०० बस आणि २०२७ पर्यंत उर्वरित बस पुरविल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण भागातील प्रवास गारेगार होणार
एसटी महामंडळाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसमध्ये एसी असणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रवास गारेगार होणार आहे. त्याचबरोबर या बस इलेक्ट्रिक असल्याने यासाठी लाणणाऱ्या इंधनाचा खर्चही कमी होणार आहे. तसेच डिझेल बसमुळे पर्यावरणाची हानी होते, मात्र इलेक्ट्रिक बसमुळे ही हानी टळणार आहे
अशा प्रकारे आपण पाहिलं की एसटी महामंडळाने कोणता असा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा