WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New home registration rules नवीन घर घेणाऱ्यांसाठी सरकारकडून आनंदाची बातमी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New home registration rules आज आपण पाहणार आहोत की आपण जर नवीन घर घेत असाल तर सरकारने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे नवीन घर घेणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ही बातमी नेमकी कोणती आहे आणि आपल्याला याचा काय फायदा होणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत नवीन घर तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी हा लेख भरपूर महत्त्वाचा आहे.

New home registration rules पूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही नवीन घर घेत आहात तर सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपले एक स्वप्न असतं की स्वतःच घर घ्याव आपल्या स्वतःचं हक्काचं घर असावं  परंतु भरपूर लोकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही त्याच्यात पहिली महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिक अडचण आणि दुसरं म्हणजे कागदपत्रे पुरावे आणि लागणारे खर्च मग घर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला पैसे लागतील नावावर करून घेण्यासाठी सरकारी कार्यालय मध्ये तुम्हाला फेऱ्यामारा लागतात त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे लागतात या सर्वांची परेशानी होत असताना सरकारने गांभीर्याने याचा विचार केलेला आहे आणि आता सर्व सामान्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहेत हा निर्णय भरपूर फायद्याचा आहे तर बघूयात की नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला याचा काय फायदा होणार आहे.

New home registration rules घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावं लागतं. अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा, काही ठिकाणी दलाल पैसे उकळतात. हा सगळा प्रकार आता थांबणार आहे. कारण राज्य सरकारने घरांच्या नोंदणीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येईल. ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन असेल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर याबाबतची माहिती जाहीर केली आहे. महायुती सरकार राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करणार असल्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं.

घरी बसून मुद्रांक नोंदणी करता येणार

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावं लागतं. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे. त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे.

१ मे पासून एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया सुरू

महसूल मंत्री म्हणाले, “तुम्ही एखादं घर खरेदी केलं असेल तर कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल. पुण्यात बसून नागपुरातील घराची, मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी फेसलेस प्रक्रिया असेल. तुमचं आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करूशकता. ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया आपण १ मेपासून सुरू करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल इंडिया, डिजीटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचं सरकार त्यावर काम करत आहे.” सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई व उपनगरांत अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती जी आता राज्यभर सुरू होत आहे.

अशाप्रकारे आपण बघितलं की नवीन घर घेणाऱ्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment