WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New education policy या वर्षापासून विद्यार्थ्यांची पुस्तक बदलली शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New education policy आज आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांच्या शालेय विद्यार्थ्यांची पुस्तकही बदललेले आहेत शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला नेमकं कोणत्या वर्गाचे पुस्तक बदलले आहेत कशामुळे बदललेले आहेत विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण आता शालेय अभ्यासक्रम जून पासून सुरु होणार आहे त्यामुळे शिक्षण विभागाने आधीच हा निर्णय घेतलेला आहे तर बघूया संपूर्ण माहिती

New education policy संपूर्ण माहिती

राज्य शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी महत्त्वाचा आहे येथे नवीन शैक्षणिक वर्ष हे जून पासून सुरुवात होते 15 जून पासून सर्व राज्य शाळा कॉलेज चालू होतील या आधी आता शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यात त्याचप्रमाणे देशभरात आता न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू होणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांची पुस्तकं अभ्यासक्रम बदलणार आहे आणि त्याची सुरुवात ही आता पहिलीपासून होणार आहे त्यामुळे कुठल्या वर्गाचे पुस्तक बदलणार आहेत याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत संपूर्ण त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे

New education policy राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी  नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचे नावे अनुक्रमे आधारशिला बालवाटिका 1,आधारशीला बालवाटिका 2 आणि आधारशिला बालवाटिका  असे राहणार आहे

महिला व बालकल्याण मंत्रालयाने  विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रम यावर आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी यंदाच्या म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राबवण्यात येणार आहे.

या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका, प्रशिक्षण साहित्य व अनुषंगिक साहित्य राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षक यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागांमार्फत सन २०२५-२६ पासून टप्प्या-टप्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार, सन २०२५-२६ मध्ये इयत्ता १ ली, सन २०२६-२७ इयत्ता २ री, ३ री, ४ थी व ६ वी सन २०२७-२८ इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी व ११ वी आणि सन २०२८-२९ इयत्ता ८ वी, १० वी व १२ वी अशी अंमलबजावणी करण्यात येईल.  

त्याचबरोबर, बालवाटिका – १, २, ३ राबविण्याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. अंगणवाडीतील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांसाठी विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य (कृतीपुस्तिका, समग्र प्रगती पुस्तिका, अन्य पूरक अध्ययन साहित्य, इ.) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यामध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या साहित्याचा उपयोगिता व परिणामकारकतेचे मूल्यमापन सदरचे साहित्य एक वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येईल. तसेच  याबाबतची उचित कार्यवाही संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे  यांच्यास्तरावरुन करण्यात येईल. त्यानुसार या उपक्रमाच्या अंमलबजावणीची पुढील कार्यदिशा  ठरवण्यात येईल असे परीपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे.  

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या वर्गाची पुस्तके बदलणार आहेत शिक्षण विभागाने कोणता निर्णय घेतला याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment