Namo shetkari hafta आज आपण पाहणार आहोत की तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झालेले आहेत कशामुळे जमा झालेले आहेत आणि कशामुळे जमा झाला होणार आहेत याचीच माहिती आपण बघणार आहोत आणि हे पैसे येण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे संपूर्ण विषयाची माहिती आज आपण पाहूयात.
Namo shetkari hafta पूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरीत आहे तुमच्या खात्यावर आजपासून दोन हजार रुपये जमा होणार आहेत हो हो तुम्ही हे खरं ऐकताय कारण आता तुम्हाला माहिती आहे की नमो किसान शेतकरी योजनेचा हप्ता 2 हजार रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारने दिलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि प्रधानमंत्री किसान योजना या अंतर्गत वर्षाला 12000 रुपये मिळतात मागच्याच वेळेस किसान योजनेचा हप्ता मिळाला होता आता नमो शेतकरी चा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे लगेच आपले अकाउंट चेक करा बघुयात पूर्ण माहिती
Namo shetkari hafta नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सहाव्या हप्त्यांतर्गत आजपासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत ₹2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्यात सन 2023-24 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पी. एम. किसान योजनेच्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 6 हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6 हजार रुपयांची भर घालत आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12 हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्य हस्ते दि. 26 ऑक्टोबर, 2023 रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे.आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत एकूण 5 हप्ते वितरीत करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना रू. 8961.31 कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते माहे डिसेंबर, 2024 ते माहे मार्च, 2025 या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या हप्ता वित्तरण सोहळयामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 92.89 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रू. 1967.12 कोटी निधीचा लाभ वितरीत करण्यात आलेला आहे.
या व्यतिरीक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी.एम. किसान योजनेअंतर्गत एकूण 65047 लाभार्थीना लाभ अदायगीचे नियोजन केले आहे. त्यानुसार राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रू.2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याचं देखील म्हटलं आहे.
अशाप्रकारे आपण बघितले की कोणाच्या खात्यावर आजपासून दोन हजार रुपये जमा होणार आहेत याची माहिती आपण पाहिले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा.
Kawa milnar paise
Student fee’s