May hafta ladaki या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे कशामुळे त्यासाठी त्यांना काय करावे लागेल याचीच माहिती आपण घेणार आहोत लाडक्या बहिणी योजनेमधील सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर आलेले आहेत.
May hafta ladaki संपूर्ण माहिती
राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना आता फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत कोणत्या बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत कोणत्या कारणामुळे मिळणारे त्याची माहिती आपण घेणार आहोत महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. जुलैपासून ही योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत महिलांना जवळपास महिन्याला दीड हजार रुपये मिळतात परंतु आता काही महिलांना फक्त पाचशे रुपये लाभ मिळणार आहे कोणत्या कारणामुळे मिळणार आहे तर बघुयात संपूर्ण विश्लेषित माहिती.
May hafta ladaki लाडकी बहीण योजनेबाबत रोज नवीन अपडेट येत असतात. लाडक्या बहिणींना आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना मे महिन्यात फक्त ५०० रुपये मिळणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलं होतं.
या महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये
लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु काही महिलांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत. इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. तसेच जर इतर योजनांमध्ये १५०० रुपयांपेक्षा कमी निधी मिळत असेल तर उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाते.
ज्या महिला नमो शेतकरी (Namo Shetkari) योजनेचा लाभ घेतात त्यांना ५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना १००० रुपये दिले जातात. त्यामुळे उर्वरित ५०० रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातात.त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.
मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एखाद्या सणाचा मूहूर्त साधत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे यंदाही तेव्हाच पैसे दिले जाण्याची शक्यता आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोर वरून डाउनलोड करा