Mahindra scholerships 2025 आज आपण पाहणार आहोत की दहावी पास विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये कसे मिळणार याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत अर्ज कसा करायचा ऑनलाइन किंवा ऑनलाइन त्याचप्रमाणे हे दहा हजार रुपये आपल्या खात्यात कसे येतील त्यासाठी पात्रता निकष अटी काय आहे या संपूर्ण विषयाची आपण माहिती घेणार आहोत
Mahindra scholerships 2025 पूर्ण माहिती
देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही दहावी पास असतील तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे हो ही गोष्ट खरी आहे कारण महिंद्रा ऑल इंडिया स्कॉलरशिप अंतर्गत दहावी पास विद्यार्थी विद्यार्थ्यांना वर्षभरात दहा हजार रुपये मिळणार आहेत हे दहा हजार रुपये अशा विद्यार्थ्यांना मिळणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी दहावीनंतर डिप्लोमा कोर्स हा घेतलेला आहे आणि त्याचा शिक्षण ते करत आहेत याबद्दलची नियम आणि अटी संपूर्ण विश्लेषित माहिती आपण पाहूयात
शिष्यवृत्ती बद्दल माहिती
केसी महिंद्रा एज्युकेशन ट्रस्टने १९९५पासून महिंद्रा ऑल इंडिया टॅलेंट स्कॉलरशिप सुरू केली आहे . ही शिष्यवृत्ती अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिली जाते, जे विद्यार्थी डिप्लोमा कोर्स करू इच्छितात असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करू शकतात .ही शिष्यवृत्ती ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.
● शिष्यवृत्तीची रक्कम:– रु. १०,०००/- प्रतिवर्ष
● पात्र अभ्यासक्रम:- डिप्लोमा
कोणत्या विद्यार्थ्यांना आर्थिक अनुदान जर मिळत असेल तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी भरपूर फायदा होतो त्यामुळे सर्वांनी महिंद्रा ऑल इंडिया स्कॉलरशिप याचा फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त या लेखनाला शेअर करा कारण एका शेअरमुळे भरपूर गरीब गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
● पात्रता निकष:-
1) जे विद्यार्थी ६०% पेक्षा जास्त गुणांसह १०वी किंवा १२वी उत्तीर्ण झालेले आहेत आणि कोणत्याही डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे असे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2) केवळ कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील उमेदवारच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
3) शिष्यवृत्तीसाठी फक्त प्रथम वर्षाचे डिप्लोमा विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
● आवश्यक कागदपत्रे :-
१) ज्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे त्या महाविद्यालयातील प्रवेशाचा पुरावा. ( उदा: ऍडमिशन लेटर , अलॉटमेंट लेटर, फी रिसिप्ट, बोनाफाईड सर्टिफिकेट )
2) दोन पैकी कोणत्याही एका रेफरन्सचे टेस्टिमोनिअल ( रेकमेंडेशन लेटर ) (शिफारस पत्र) ( शिक्षण किंवा एम्प्लॉयर यांपैकी कोणीही रेफरन्स लेटर देऊ शकतात.)
3) तुमची सामान्य योग्यता आणि स्वारस्य, तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा आहे आणि तुमच्या जीवनातील महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा याबद्दल एक छोटासा निबंध.
4) आधार कार्ड
५) इयत्ता १०वी च्या मार्कशीटची प्रत.
६) इयत्ता १२वी च्या मार्कशीटची प्रत. ( जर इयत्ता १२वी परीक्षा देऊन नंतर डिप्लोमा करीत प्रवेश घेतला असेल तर )
7) कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्राची प्रत किंवा उत्पन्नाचा पुरावा
8) पासबुकच्या पहिल्या पानाची किंवा रद्द केलेल्या चेकची प्रत
( कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे यादीत नमूद केल्यानुसार कागदपत्रांचे नाव बदलून कागदपत्रे अपलोड करावे, अधिक माहिती करीत खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.)
आवश्यक कागदपत्रांची यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :-
https://www.kcmet.org/IMAGES/legal-certificates/List-of-documents-for-MAITS.pdf
● ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: –
● संपर्क तपशील:-
पत्ता:
के.सी. महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट
सेसिल कोर्ट, रीगल सिनेमाजवळ, महाकवी भूषण मार्ग, मुंबई ४०००१
ई – मेल आयडी:
maits@mahindra.com
● टीप:-
1) शिष्यवृत्तीसाठी मुलींना, अल्प उत्पन्न गटातील कुटुंबातील मुले, अपंग विदयार्थी आणि सशस्त्र दलातील कर्मचार्यांच्या मुलांना प्राधान्य दिले जाईल.
2) पहिले वर्ष पूर्ण केलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
3) जे विद्यार्थी डिग्री अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत किंवा डिप्लोमा व्यतिरिक्त कोणत्याही अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहेत ते देखील या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.
अशाप्रकारे आपण पाहिला की दहावी पास विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये कसे मिळणार आहेत या विषयाची संपूर्ण माहिती आपण घेतली आहे दहावी-बारावी बोर्डाच्या नोट्स मिळवण्यासाठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा तसेच लेटेस्ट अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
I want ohol 300 per month because I have help my father for per month