Maharashtra school exam आज आपण पाहणार की राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत परंतु आता पहिली ते नववीच्या ज्या परीक्षा आहेत यामध्ये आता यावर्षी बदल करण्यात आला होता. या परीक्षा साधारणपणे 25 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार होत्या परंतु आता ही वेळापत्रक बदललेला आहे आणि कोर्टाने काय सांगितलेला आहे नवीन सुधारित वेळापत्रक का असेल तर बघूयात संपूर्ण माहिती.
Maharashtra school exam संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थी शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण आता पहिली ते नववीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होत होत्या त्या वेळापत्रक जाता बदल होणार आहे कारण जो आदेश दिला होता आधी सरकारने 25 एप्रिल पर्यंत परीक्षा घेण्याचा त्याच्या विरोधात शिक्षक संघटनांनी कोर्टात याची राखी केली होती आणि कोर्टाने आता शिक्षक संघटना यांच्या बाजूने तो निर्णय दिला आहे कारण वाढता उन्हाळा आहे त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे चांगलं नाहीये लवकरात लवकर परीक्षा घेण्यात याव्यात ना आता राज्यभर परीक्षा देखील सुरू आहेत ना तर त्या वेळापत्रक काय बदल होऊ शकतो बद्दल करण्यास सांगितलेला आहे कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत आता त्या परीक्षा कशा होतील ते बघुयात संपूर्ण माहिती.
Maharashtra school exam: राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीने एक नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे. विशेषता विदर्भात आणि मराठवाड्यात तापमानामुळे अंगाची अक्षरशा लाहिलाही होत आहे.
दरम्यान या कडक अन तीव्र उन्हात शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. असह्य उन्हात शाळकरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असल्याने पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४४ अंश सेल्सियसचा टप्पा पार केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला तातडीने परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे आता लवकरच विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा हस्तक्षेप केला असून याचा परिणाम म्हणून शालेय प्रशासन आणि पालकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
परीक्षा १५ एप्रिलच्या आत घेण्याचे निर्देश
शिक्षण विभागाने याआधी एकसंध राज्यव्यापी वेळापत्रक लागू केल्यामुळे विदर्भातील परीक्षांचा कालावधी वाढला होता. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आणि स्थानिक शाळांनी याविरोधात आवाज उठवला.आता न्यायालयाच्या आदेशामुळे परीक्षा १५ एप्रिलच्या आत घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, त्यानुसार प्रशासन हालचाली सुरू सुद्धा झाल्या आहेत. यामुळे आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठीचे सुधारित वेळापत्रक कसे असणार? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार असेल.
आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत…
खरेतर, राज्यातील १ कोटी ४५ लाख विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होत आहेत. यंदा नववीसाठी प्रथमच लागू करण्यात आलेली नियतकालिक मूल्यांकन पद्धतीदेखील शिक्षण व्यवस्थेत नवे परिवर्तन घडवून आणत आहे. दरम्यान आता विदर्भात उष्णतेच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या परीणामाला आळा बसावा आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात परीक्षा देता याव्यात, त्यांना तीव्र उन्हाचा फटका बसू नये, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत या उद्देशाने हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील ज्या परीक्षा आहेत पहिली ते नववी यांच्या वेळापत्रक बदल झालेला आहे आणि आता ही सर्व माहिती आपण पाहिली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा