WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

loan Home rules घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


loan Home rules आज आपण पाहणार आहोत की जर तुम्ही घर किंवा गाडी घेत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे नेमकी ती आनंदाची बातमी कुठली आहे आणि यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना नागरिकांना याचा काय फायदा होणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज पाहणार आहोत

loan Home rules संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे हे आपल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सर्वात मोठे यश म्हणजे आपलं स्वतःचं घर असणार पण स्वतःचं घर बांधण्यासाठी आपल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आता तुम्हाला घर किंवा गाडी घ्यायची असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात किंवा थोडासा तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो बँकेचे काही ना काही नियम बदलत असतात आता काही नियम बदललेत ज्यामध्ये ग्राहकांना फायदा होऊ शकतो. बघूया संपूर्ण माहिती


loan Home rules घर आणि कार खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आता दिलासा देणारी बातमी समोर आलीये. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कमी केल्यानंतर आता काही बँका आपला व्याजदर कमी करत आहेत. कॅनरा बँक आणि इंडियन बँक या देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांनी आपल्या कर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केलीये. रिझर्व्ह बँकेनं नुकताच रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.०० टक्क्यांवर आणला आहे.

कॅनरा बँकेनं आपल्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेटमध्ये (आरएलएलआर) २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे, जी १२ एप्रिल २०२५ पासून लागू झाली आहे. आता या बँकेतील गृहकर्जाचा व्याजदर वार्षिक ७.९० टक्क्यांपासून सुरू झालाय, तर वाहन कर्जाचा वार्षिक ८.२० टक्क्यांपासून सुरू होणार आहे. या बदलामुळे ग्राहकांचा ईएमआय कमी होईल आणि नवीन कर्जदारांना तो परवडणारा पर्याय बनेल, असं बँकेचं म्हणणं आहे.

त्याचप्रमाणे इंडियन बँकेनंही गृहकर्जाचा व्याजदर ८.१५ टक्क्यांवरून ७.९० टक्के आणि वाहन कर्जाचा व्याजदर ८.५० टक्क्यांवरून ८.२५ टक्क्यांवर आणला आहे. विशेष म्हणजे इंडियन बँक आता प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्जेस न घेता डिस्काऊंट देत आहे, ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त दिलासा मिळणार आहे.

कर्जदारांना मिळणार दिलासा
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपला एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) ८.९०% वरून ८.६५% पर्यंत कमी केला आहे. पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियानंही आरएलएलआर आणि आरबीएलआरमध्ये अनुक्रमे ०.२५ टक्के कपात केली आहे. बँक ऑफ इंडियानं ९ एप्रिल २०२५ पासून हे नवे दर लागू केले आहेत. या कपातीमुळे कर्ज मिळणे पूर्वीपेक्षा सोपं होईल, असं तज्ज्ञांचे मत आहे. विशेषत: मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदाच घर किंवा कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. तसंच यामुळे ऑटो आणि रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment