WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lekha koshagar Bharti 2025 महिन्याला 35हजार पगार आतच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lekha koshagar Bharti 2025 पूर्ण माहिती

आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी नोकरी मिळणार यासाठी अर्ज कसा करावा याची पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत

Lekha koshagar Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयामध्ये कनिष्ठ लेखापाल (गट क) पदासाठी एकूण 56 पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्रतेमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी टंकलेखन (30 श.प्र.मि.) किंवा इंग्रजी टंकलेखन (40 श.प्र.मि.) आवश्यक आहे. वयोमर्यादा 19 ते 38 वर्षे असून, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज स्विकारण्याची पद्धत Lekha koshagar Bharti 2025
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 09 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ₹1000/-, राखीव प्रवर्गासाठी ₹900/-, तर माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क नाही. नोकरी ठिकाण नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, आणि चंद्रपूर या ठिकाणी असेल.

कोणत्या विभागात भरती Lekha koshagar Bharti 2025

ही भरती नागपूर विभागासाठी एक उत्तम संधी आहे, कारण महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयामध्ये स्थिर व चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि अंतिम तारखेआधी अर्ज सादर करावा.

प्रस्तुत जाहिरात ही परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया याबाबतचा सविस्तर तपशील दिनांक १०.०१.२०२५ रोजी https://mahakosh.maharashtra.gov.in सर्वसाधारण सूचना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे कृपया अवलोकन करावे, भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदार, सूचना वगैरे https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील, उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे. है. परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार सहसंचालक, लेखा व कोषागारे, नागपूर विभाग, नागपूर यांना राहतील व या संदर्भातील त्यांचा निर्णय अंतिम राहील. याबाबत कोणासही कोणताही दावा करता येणार नाही.

आवश्यक टिप्स Lekha koshagar Bharti 2025

टीप: १) भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

२) वरील राखीव/बिनाराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवगांतील अन्य

पात्र उमेदवारांची निवड करून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल.

३) उपरोक्त पदांपैकी काही पदे ही शासन नियमानुसार अनाभासाठी व दिव्यांगासाठी आरक्षित असून सदर पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता

गुणवत्ता क्रमांकानुसार भरली जातील. Lekha koshagar Bharti 2025

सदर जाहिरात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम दिनांक २६.०२.२०२४ व संबंधित शासन निर्णय दिनांक २०.०२.२०२४ संदर्भात मा. उच्य न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र. ३४६८/२०२४ व इतर अन्वये दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील मायालयाच्या अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिराती संबंधित शिफारसी व नियुकया उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येतील.

वरील लेखात आपण या नोकरी विषयी पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment