Lek ladaki Yojana आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला जर मुलगी असेल तर आपल्याला कशाप्रकारे एक लाख रुपये मिळतील त्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल वयाची अट काय असेल अर्ज ऑनलाईन करायचा की ऑफलाइन या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत
Lek ladaki Yojana पूर्ण माहिती
Lek ladaki Yojana महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने स्त्रियांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत पुरुषांसाठी योजना आहेत मुलांसाठी योजना आहेत आता मुलींसाठी देखील एक योजना सुरू केली आहे त्याचं नाव आहे लेक लाडकी योजना या अंतर्गत राज्यातील मुलींना जवळपास एक लाख रुपये मिळणार आहे त्याचे नाव नोंदणी कुठे करायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
Lek ladaki Yojana स्त्रीभ्रूण हत्येला आळा बसावा, मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढावे, पालकांनी त्यांच्या जन्माचे स्वागत करावे यासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली असून, त्याला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. योजनेत आतापर्यंत ५४०० इतके अर्ज मंजूर करण्यात आले असून, या मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
मुलींच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येणार आहे. महिला व बाल कल्याण विभागाने मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, त्यांच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षे होईपर्यंत एक लाख एक हजार रुपयांची रक्कम खात्यात वर्ग केली जाणार आहे.
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने राबवलेली मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेमध्ये मुलीला तिच्या जन्मापासून ते अठरा वर्षाच्या वयापर्यंत विविध शैक्षणिक टप्प्यावर आर्थिक मदत केली जाते, या योजनेचे मुख्य उद्देश मुलीच्या जन्मदरात वाढ करणे त्यांचे शिक्षण सुलभ करणे आरोग्य व पोषण सुधारणे तसेच सामाजिक स्तर वृद्धी करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
काय आहे लेक लाडकी योजना?Lek ladaki Yojana
गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे ‘लेक लाडकी’ योजना जाणून घ्या..!
राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत. लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे.
फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.
मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! शिक्षणात प्रगती करण्यासाठी मुलींना होणार मदत
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे
मुलींसाठी फायदेशीर आहे
लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी खूप फायद्याची व वरदानदायी ठरणार आहे. राज्याच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा तिला 75 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. या अनुषंगाने या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेविषयीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
शासन मुलींना देणार एक लाख एक हजार रुपये
मुलींचा जन्मदर वाढवणे व शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे याकरिता आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार असून कुटुंबामध्ये जर एक मुलगा व एक मुलगी असेल तर मुलीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार असून जी मुलगी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आहे त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत.
जर आपण या योजनेच्या माध्यमातून मुलीला मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे स्वरूप पाहिले तर मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये, जेव्हा मुलगी पहिली मध्ये जाईल तेव्हा 6000 रुपये, सहावीत मुलगी गेल्यानंतर सात हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जाणार आहे. म्हणजेच एकूण मुलीला एक लाख एक हजार रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.
योजनेअंतर्गत, मुलीला तिच्या जन्मापासून ते 18 वर्षे वयापर्यंत विविध टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते.
आशा टप्प्यानुसार मुलींना मदत केली जाईल
जन्माच्या वेळी: ₹5,000
1ली इयत्ता: ₹4,000
6वी इयत्ता: ₹6,000
11वी इयत्ता: ₹8,000
18 वर्षे पूर्ण झाल्यावर: ₹75,000
शिक्षण:
लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देणे या योजनेमुळे मुलीचे शिक्षण सुरक्षित होते व त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळते ज्यामुळे महिलांच्या साक्षरतेत वाढ होते.
आरोग्य व पोषण:
या योजनेमुळे मुलींना आर्थिक मदतीमुळे त्यांच्या आरोग्य व पोषणाकडे अधिक लक्ष देणे शक्य होते जे त्यांचे मानसिक व शारीरिक विकासासाठी महत्त्वाचे आहे.
सामाजिक आणि सांस्कृतिक:
मुलींच्या जन्मदरात वाढ करणे तसेच समाजात मुलीची स्थिती सुधारण्यास योजना मदत करते .18 वर्षापर्यंत आर्थिक मदत मुलींना त्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी एक पाया देऊ शकते त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यास मदत करते.
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
पालकांचे राशन कार्ड
मुलीचे जन्म प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
कसा कराल योजनेसाठी अर्ज ?Lek ladaki Yojana
लेक लाडकी योजनेसाठी ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका यांच्याकडे अर्ज करता येईल. शहरी भागात अंगणवाडी सेविकांसह मुख्य सेविकांकडे अर्ज करता येईल. हा अर्ज पडताळणीसाठी शहर आणि ग्रामीण भागातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जाईल. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी हा अर्ज महिला व बालकल्याण विभागाच्या मुख्य कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे किंवा उपनगरातील नोडल अधिकाऱ्यांकडे जाईल. ‘लेक लाडकी’ योजना मुलींचे आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आली आहे. मुलींना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यातही या योजनेमुळे मदत होईल. त्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त करण्यात ही योजना महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वरील लेखनात आपण पाहिले की कश्याप्रकारे आपल्याला जर मुलगी असेल तर आपल्याला सरकारकडून कशाप्रकारे एक लाख रुपये मिळतील याची माहिती घेतली आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप करा जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123 या क्रमांकावर संपर्क करा