WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Land registry online process तलाठी कार्यालयात फेऱ्या मारायचे बंद करा शेतीचे सर्व कामे मोबाईलवर करा सरकारचा मोठा निर्णय.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज आपण पाहणार आहोत की राज्य सरकारने महसूल विभागातून एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता तलाठी कार्यालयात काही कामांसाठी फेऱ्या मारण्याचे शेतकऱ्यांचे त्याचबरोबर नागरिकांचे बंद होईल याचीच माहिती आपण या लेखनात घेणार आहोत

Land registry online process पूर्ण माहिती

राज्य सरकारने महसूल विभागांतर्गत काही दिवसांपूर्वी महत्वाचा निर्णय घेतला आहे. वारसा नोंद आणि इतर कार्यालय कामकाज आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्याच्या स्थितीला बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद करणे, ई करार करणे , मयत झालेल्या लोकांचे नावे कमी करणे यासाठी आणि इतर महसूल कामासाठी तलाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असतात.

या कामांसाठी तलाठी कार्यालयात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे नागरिकांचे कामे हे वेळेत होत नाहीत. नोंदी करण्यासाठी सातत्याने तलाठी कार्यालयात जावे लागते. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एका तलाठीकडे दोन ते तीन गावांचा कारभार देण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्याला मोठा दिलासा

राज्यातील शेतकऱ्यांना भरपूर काम असतात त्याचप्रमाणे त्यांना त्यांचे काम करत असताना काही जमिनीचे त्याचप्रमाणे नोंद असेल कुठली आणखी शेती संबंधित कामे असते तर ते तुम्ही आता घरी बसल्या मोबाईलवर करू शकतात त्यामुळे आता त्यांचा एक ताण दूर झालेला आहे.

त्यामुळे तलाठी कार्यालयात नागरिकांची प्रचंड हेंडसाळ होताना दिसून येते. त्याच बरोबर नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील होत असते. छोट्या मोठ्या कामांसाठी कमिशन द्यावे लागते. या सर्व गोष्टींवर आळा बसण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

नोंद कुठे करायची आणि कशी करावी Land registry online process

दरम्यान हे सर्व कामे करण्यासाठी महसूल विभागाच्या pdeigr.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर जावे लागणार आहे. ही वेबसाइट शासनाची अधिकृत वेबसाइट आहे. याचा वापर नागरिक करू शकणार आहे.

ऑनलाइन हक्क प्रणालीचा वापर होणार.

राज्य सरकारने महसूल विभागाच्या कामासाठी ई हक्क प्रणालीचा वापर केला जाणार आहे. त्याचा वापर करून नागरिक हे बोजा दाखल करणे, बोजा कमी करणे, वारस नोंद करणे, ई करार करणे , मयत झालेल्या लोकांचे नावे कमी करणे यासह अन्य कामांसाठी ई हक्क प्रणालीचा वापर करता येणार आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नक्कीच राज्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे याची माहिती आपण या लेखनात पाहिली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment