Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे आपल्याला सरकारी योजनेचा लाभ मिळेल यासाठी अर्ज कसा भरायचा पात्रता काय असेल याची पूर्ण माहिती आपण घेणार लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
Ladki Bahin Yojana एवढे उपत्न असले पाहिजे
ज्या कुटुंबांचं वार्षिक उपत्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
ज्या कुटुंबांचं वार्षिक उपत्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक हातभार लागावा यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण सहा हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. नुकताच डिसेंबरचा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे
Ladki Bahin Yojana काय आहे अट
जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही महिलांच्या खात्यात 2100 रुपये दर महिन्याला जमा करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती, त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या मार्चपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे ज्या महिला निकषात बसणार नाही, आणि त्यांची जर तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळनी होणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली आहेत
ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, ज्या महिलेच्या मालकीची कार आहे. तसेच ज्या लाभार्थी महिलेचं आधार कार्डला एक नाव आणि बँक खात्यामध्ये दुसरं नाव आहे, अशा महिलांची तक्रार आली तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होईल, मात्र जीआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असं तटकरे यांनी म्हटलं होतं. तटकरे यांच्या या माहितीनंतर योजनेबाबत चर्चेला उधाण आलं होतं. अखेर यावर आता विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मोठी अपडेट दिली आहेत
काय म्हणाल्या निलम गोऱ्हे? Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. शासनाने कोणत्याही नियमात बदल केलेला नाही, सर्व पात्र महिलांना शेवटपर्यंत योजना लागू राहणार आहे, असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहेत
मार्चपर्यंत 2100 रुपये मिळण्याची शक्यता Ladki Bahin Yojana
दरम्यान 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या संदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे, त्यानंतर लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळू शकत
वरील लेखनात आपण या योजनेची पूर्ण माहिती घेतली आहे सर्व अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..