Ladaki bahin yoajana update आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांना आता कर्ज मिळणार आहे त्यासाठी त्यांना काय करावे लागेल पात्रता काय लागेल त्याचप्रमाणे कागदपत्र कोणते लागतील आठ काय असेल या संपूर्ण विषयाची माहिती आपण पाहणार आहोत.
Ladaki bahin yoajana update पूर्ण माहिती
महाराष्ट्रात अल्पावधीत सर्वात लोकप्रिय असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 01 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे राज्यातील दोन पूर्णांक 74 करून पात्र वगेरे आहे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का आता लाडकी बहीण अंतर्गत लाडक्या बहिणींना कर्ज देखील मिळणार आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहूयात
Ladaki bahin yoajana update महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांकडून टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असल्याचा आरोप केला जात आहे. या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली. यावेळी विरोधकांच्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण यांच्या मनातून काही जात नाही. लाडकी बहीण आमची झाली आहे. त्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नाही, असे ठामपणे अजित पवार यांनी सोमवारी सांगितले
लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज योजना आणा…
लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी योजना आहे. या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो. १५०० रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचे एक मोठ पाऊल सरकारने उचलले. परवाच विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली. लाडकी बहिण योजनेच अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँकेत १० ते २५ हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. मी या सर्वांना आवाहन करणार आहे. ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा.
लाडकी बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू. कारण, हा थोडाथडका पैसा नाही. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटे, मोठे योगदान मिळेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना कर्ज मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहिले आहे तरी आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप पाठवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा