Ladaki bahin apatra list 2025 आज आपण पाहणार आहोत की कश्याप्रकारे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू केली होती परंतु आता लाडके बहिणी योजनेत भरपूर महिला अपात्र होत आहेत नेमक्या कोणत्या महिला अपात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात किती अपात्र आहेत याचीच माहिती आपण घेणार आहोत
Ladaki bahin apatra list 2025 पूर्ण माहिती
महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली होती या अंतर्गत जवळपास राज्यातील दोन पूर्णांक 74 करोड महिला याचा लाभ घेत आहेत परंतु आता या महिलांना अपात्र करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे काही महिला निकष मध्ये बसत नसताना देखील याचा लाभ घेत आहे हे सरकारच्या माहितीस पडले आहे त्यामुळे आता या महिला अपात्र होणार आहेत तर पाहूयात संपूर्ण विश्लेषित माहिती
आता 10 लाख महिलांना अपात्र करण्यात येणार आहे. इन्कम टॅक्स खात्याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. अपात्रतेच्या निकषांनुसार आयकर विभागाच्या माध्यमातून खात्याची तपासणी करून महिलांना अपात्र केले जाणार आहे. दुसरीकडे राज्य सरकार या पाच लाख लाडक्या बहिणींकडून दिलेले पैसे परत घेण्याची तयारी सुरू केली आहे ? महायुती सरकारमधील काही मंत्रींनी सुद्धा अपात्र बहिणींचे पैसे परत घेण्यासंदर्भातील चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींची नावं कमी करण्यात आले आहे असे सांगितले आहे. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अपात्र बहिणी स्वतः पैसे परत करायला तयार असल्याचे सांगितले आहे.
अदिती तटकरे यांनी काय महिती दिली
शासन निर्णयानुसार दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहे.
अपात्र ठरविण्याचे निकष!
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – 2,30,000
वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1,10,000
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – 1,60,000
एकूण अपात्र महिला – 5,00,000
वरील तक्त्यामध्ये तुम्ही पाहिलं की जवळपास किती महिला अपात्र ठरविण्यात आले आहेत तसेच आणखीन देखील अर्जाची चाचणी सुरू आहे त्यामुळे आणखीन देखील हा आकडा वाढू शकतो
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असेही तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर पैसे परत घेणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक लाडक्या बहिणींना सरसकट लाभ मिळाल्याने एक मोठी रक्कम सरकारला परत करावी लागणार असल्याने सध्या काही लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. तर आयकर विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याने अनेक कुटुंबे घाबरले आहेत. ..
अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या लाडक्या बहिणी या पात्र होणार आहेत किती होणार आहेत याची माहिती आपण घेतली आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशनॲप प्लेस्टोर वरून डाऊनलोड करा
Kadi honor