WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

June new rules 1जून पासून देशभरात हे 10मोठे बदल नागरिकांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

June new rules आज आपण पाहणार आहोत की एक जून पासून देशभरात कोणते मोठे बदल होणार आहेत याची माहिती आपण घेणार आहोत प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काय ना काही बदल होत असतात तर आता हे महत्त्वाचे दहा बदल होणार आहेत त्याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे बदल ग्राहकांसाठी किती उपयोगी आहेत आणि नागरिकांसाठी हे महत्त्वाचे काय आहे त्याची माहिती आपणास घेणार आहोत.

June new rules संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे आपल्या देशभरात प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव असतील चांदीचे भाव असतील जमिनीचे भाव असतील या सर्वांच्या किमतीमध्ये चढउतार पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे बँकेचे नियम सरकारी काही नियम हे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बदलत असतात तर आता बघणार आहोत आपण त्या संदर्भात पेमेंट संदर्भात आणि दुसऱ्या अंतिम असे एकूण दहा नियम कुठल्या कुठल्या नवीन लागू होणार आहेत याविषयी आपण आज नवीन माहिती घेणार आहोत त्यामुळे ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे हे नियम आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे

June new rules जून महिना तुमच्या बजेटसाठी अनेक प्रकारे महत्त्वाचा ठरू शकतो. 1 जून 2025 पासून अनेक आर्थिक आणि वापरकर्ता-सेवेशी संबंधित नियम बदलणार आहेत. यामध्ये बँक एफडी, क्रेडिट कार्ड, एलपीजी गॅस, पीएफ काढणे, एटीएम आणि म्युच्युअल फंडमध्ये आधार अपडेट करणे यासारख्या बदलांचा समावेश आहे. कोणते आहेत ते बदल आणि त्याचा तुमच्या खिश्यावर कसा परिणाम होणार जाणून घ्या सविस्तर…

1. ईपीएफओ 3.0 लाँच होणार: ईपीएफओ 1 जूनपासून ईपीएफओ 3.0 ची नवीन आवृत्ती लाँच करत आहे. यासह, पीएफ काढणे, केवायसी अपडेट आणि क्लेम प्रक्रिया पूर्वीपेक्षा जलद आणि सोपी होईल. विशेष म्हणजे एटीएम कार्डप्रमाणे ईपीएफशी संबंधित कार्ड देखील वापरता येतील.

2. एफडी व्याजदरात बदल शक्य: जूनमध्ये बँका मुदत ठेवी आणि कर्जाचे व्याजदर बदलू शकतात. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याची शक्यता असल्याने एफडी दर कमी होऊ शकतात. उदाहरणार्थ, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 5 वर्षांच्या एफडीवरील व्याजदर 8.6 % वरून 8% पर्यंत कमी केला आहे.

3. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स आणि शुल्कात बदल: 1 जूनपासून कोटक महिंद्रा बँक आणि इतर बँकांच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल होतील. रिवॉर्ड पॉइंट्सची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते, ऑटो-डेबिट फेल्युअरसाठी दंड कमी केला जाऊ शकतो आणि इंधन/युटिलिटी पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.

4. एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतील: दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. 1 जून रोजी, घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती वाढू किंवा कमी होऊ शकतात, ज्याचा थेट तुमच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर परिणाम होईल.

5. एटीएम व्यवहार शुल्क वाढण्याची शक्यता: जूनपासून  एटीएममधून मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर आकारण्यात येणारा शुल्क वाढू शकतो. जे लोक वारंवार पैसे काढतात त्यांच्या खिशावर या बदलाचा परिणाम जाणवेल.

6. म्युच्युअल फंडांमध्ये नवीन कट-ऑफ वेळ: सेबीने ओव्हरनाईट म्युच्युअल फंड योजनांसाठी नवीन कट-ऑफ वेळ लागू केली आहे. 1 जूनपासून ऑफलाइन व्यवहारांसाठी दुपारी 3  वाजता आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी संध्याकाळी 7 वाजता वेळ असेल. त्यानंतर केलेल्या ऑर्डरचा विचार पुढील कामकाजाच्या दिवशी केला जाईल.

7. मोफत आधार अपडेटसाठी अंतिम मुदत: आधार कार्डची मोफत अपडेट सुविधा फक्त 14 जून 2025 पर्यंत आहे. त्यानंतर ऑनलाइन अपडेटसाठी ₹ 25 आणि केंद्रावर ₹ 50 शुल्क आकारले जाईल. म्हणून ओळख आणि पत्ता पुरावा लवकर अपडेट करा.

8.  UPI व्यवहारांमध्ये खऱ्या प्राप्तकर्त्याचे नाव दिसणार: NPCI ने एक नवीन नियम लागू केला आहे ज्या अंतर्गत UPI पेमेंट करताना वापरकर्त्याला फक्त ‘अल्टीमेट बेनिफिशियरी’ म्हणजेच खऱ्या प्राप्तकर्त्याचे बँकिंग नाव दिसेल. QR कोड किंवा संपादित नावे यापुढे दिसणार नाहीत. हे नियम ३० जूनपर्यंत सर्व UPI अॅप्सना लागू करावे लागतील.

9 जूनमध्ये बँका 12 दिवस बंद: RBI नुसार, जून 2025 मध्ये एकूण 12 बँक सुट्ट्या असतील, ज्यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे. याशिवाय, बकरी ईद सारख्या सणांवरही बँका बंद राहतील. रोख रक्कम किंवा बँकिंगचे नियोजन आगाऊ करा.

10. क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल भरणे: काही बँकांनी असे सूचित केले आहे की जूनपासून, क्रेडिट कार्डद्वारे वीज, पाणी यांसारखी युटिलिटी बिल भरण्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते किंवा कॅशबॅकच्या अटी बदलल्या जाऊ शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की देशभरात एकूण दहा बद्दल कोणते होणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन
कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा

Leave a Comment