July rules new आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे नियम बदललेली आहे कोणते नियम बदलले कशामुळे आणि याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत
July rules new संपूर्ण माहिती
राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे काही नियम बदलतात दर महिन्याच्या सुरुवातीला रेल्वेचे असतील तेलाचे दर असतील त्याचप्रमाणे इतर काही ठिकाणी नियम बदलत असतात हे नियम कोणते आहेत आणि कशामुळे बदललेले आहेत याचा काही परिणाम होईल सोने चांदी असेल किंवा वाहतूक असेल बँक असेल तर सर्व नियमांमध्ये बदल होतात तर बघूयात याविषयी माहिती
1 जुलैपासून बदलणार रेल्वेचे नियम
जून महिना संपत आला असून, एका दिवसानंतर जुलै महिन्याची सुरुवात होणार आहे. प्रत्येक महिन्याप्रमाणे, पहिल्या तारखेपासूनच देशात अनेक मोठे बदल लागू होतील. याचा परिणाम प्रत्येक घराच्या आणि प्रत्येकाच्या खिशावर होऊ शकतो. या बदलांमध्ये घरातील स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्ड वापरावरील शुल्कात वाढ करण्यापर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. भारतीय रेल्वेसुद्धा १ जुलैपासून आपल्या नियमांमध्ये बदल करणार आहे.
LPG सिलेंडरच्या किमती
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील जनतेचे लक्ष तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांकडे लागलेले असते, कारण हे थेट स्वयंपाकघराच्या बजेटशी संबंधित आहे. गेल्या जून महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या आणि त्यात प्रति सिलेंडर २४ रुपयांपर्यंतची कपात केली होती. मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बऱ्याच महिन्यांपासून स्थिर आहेत. त्यामुळे त्यांच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
HDFC क्रेडिट कार्ड महागणार
क्रेडिट कार्डशी संबंधित मोठा बदल होणार आहे. तुम्ही एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर १ जुलै पासून तुमच्यासाठी ते खर्चिक ठरेल. बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना युटिलिटी बिल भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. याशिवाय, एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून डिजिटल वॉलेट्समध्ये (Paytm, Mobikwik, FreeCharge किंवा Ola Money) महिन्याभरात १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम टाकल्यास १ टक्के शुल्क आकारले जाईल.
आयसीआयसीआय एटीएम शुल्क
१ जुलै पासून लागू होणारा तिसरा आर्थिक बदल आयसीआयसीआय बँकेशी संबंधित आहे. मेट्रो शहरांमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मधून ५ वेळा पैसे काढल्यानंतर पुन्हा पैसे काढण्यावर २३ रुपये शुल्क लागू होईल. नॉन-मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा तीन निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, IMPS ट्रान्सफरवरील नवीन शुल्काबद्दल बोलायचे झाल्यास, १ हजार रुपयांपर्यंतच्या मनी ट्रान्सफरवर २.५० रुपये प्रति व्यवहार, त्याहून अधिक आणि १ लाख रुपयांपर्यंतच्या ट्रान्सफरवर ५ रुपये आणि १ लाखापेक्षा जास्त व ५ लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर १५ रुपये शुल्क असेल.
तात्काळ रेल्वे तिकीट आणि भाडे
भारतीय रेल्वे जुलै महिन्याच्या पहिल्या तारखेपासून अनेक नियम बदलणार आहे. रेल्वे तिकीट दरात वाढ होणार आहे, नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यात प्रति किलोमीटर १ पैशांची, तर एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ होईल. ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी सेकंड क्लासच्या रेल्वे तिकीट दरात आणि एमएसटीमध्ये कोणताही बदल होणार नाही, परंतु ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापायचे असल्यास, प्रवाशाला प्रति किलोमीटर अर्धा पैसा द्यावा लागेल. रेल्वेचा दुसरा बदल तात्काळ तिकीट बुकिंगशी संबंधित आहे. या बदलानुसार, १ जुलै २०२५ पासून केवळ आधार-व्हेरिफाइड वापरकर्तेच IRCTC वेबसाइट किंवा ॲपवर तात्काळ तिकीट बुक करू शकतील.
दिल्लीत या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही
राजधानी दिल्लीत १ जुलैपासून जुन्या वाहनांना पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल न देण्याची घोषणा करण्यात आली होती. कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटच्या (CAQM) मते, जुलैच्या पहिल्या तारखेपासून एंड-ऑफ-लाइफ (EOL) म्हणजेच मुदत संपलेल्या जुन्या वाहनांना पंपावर इंधन घेण्याची परवानगी नसेल. ईओएल अंतर्गत १० वर्षे जुनी डिझेल वाहने आणि १५ वर्षे जुनी पेट्रोल वाहने यांचा समावेश आहे.
1 जुलैपासून रेल्वे अनेक मोठे नियम बदलणार आहे.
– तत्काळ बुकिंगचे नियम बदलत आहेत. तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी, आयआरसीटीसीची वेबसाइट आणि अप आधारशी लिंक करावे लागेल.
वेटिंग तिकिटे असलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेने ट्रेन सुटण्याच्या 4 तासांऐवजी 8 तास आधी आरक्षण शुल्क सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
– तुमचे आयआरसीटीसी खाते आधारशी लिंक करावे लागेल.
अशाप्रकारे आपण पाहिलं की नियमांमध्ये कोणते बदल झालेले त्याची माहिती आपण बघितले आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वरती टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा