Holidays in February 2025 आज आपण पाहणार आहोत की फेब्रुवारी महिना हा सुरू होणार आहे फेब्रुवारी महिन्यात तब्बल 14 दिवस सुट्टी आहेत कशामुळे अनेक कोणत्या कारणास्तव या सुट्ट्या आहेत याचेच पूर्ण माहिती आपण घेणार आहोत
Holidays in February 2025 पूर्ण माहिती
सुट्टी म्हणलं की आनंदीचा दिवस असतो आणि सुट्टीचं नियोजन करताना आपण व्यवस्थित नियोजन करत असतो प्रत्येक कॅलेंडरला वार दिनांक बघून आपण कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असतो यातच आता जानेवारी महिना संपत आलेला आहे फेब्रुवारी महिन्यात किती दिवस सुट्टी आहेत सलग सुट्ट्या किती आहेत त्याचप्रमाणे साप्ताहिक सुट्ट्या किती आहेत याची माहिती आपण पाहूयात
Holidays in February 2025 फेब्रुवारी हा महिना बँक सुट्ट्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो, कारण या महिन्यात सुट्ट्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँकिंग व्यवहारांचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. फेब्रुवारी 2025 मधील बँक सुट्ट्यांबाबतची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला आर्थिक व्यवहार आणि नियोजन सोपं होईल. सुट्ट्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन व्यवहारांची पूर्वतयारी केल्यास अडचणी टाळता येतील.
जानेवारी महिन्याचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी राहणार हे जाणून घेणं आवश्यक आहे. बँकांमधील विविध कामांचं नियोजन पुढच्या महिन्यात करणार असाल तर तुम्हाला बँकांचं कामकाज किती दिवस सुरु असेल, कोणत्या दिवशी सुट्टी असेल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यंदाचा फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा आहे. या 28 दिवसांच्या कालावधीत बँकांना कामकाज करण्यासाठी देखील पूर्ण दिवस मिळत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं फेब्रुवारी महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार याची यादी जारी केली आहे. तुम्ही देखील तुमच्या शहरात कोणत्या दिवशी बँक बंद राहणार अन् कोणत्या दिवशी सुरु राहणार हे पाहायला हवं.
बँकांच्या सुट्ट्या
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ही भारतातील बँकांचे नियंत्रण करणारी प्रमुख संस्था आहे. देशभरातील वेगवेगळ्या धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसांसाठी बँकांच्या सुट्ट्या जाहीर करण्याचे काम RBI करते. फेब्रुवारी महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये विविध राज्यांनुसार वेगवेगळ्या सण व विशेष दिवसांचा समावेश आहे. प्रत्येक राज्याच्या परंपरा आणि सणांना महत्त्व देऊन या सुट्ट्या ठरवल्या जातात.
विशेष सुट्ट्या
फेब्रुवारी महिन्यातील काही विशेष सुट्ट्या पुढीलप्रमाणे आहेत. 3 फेब्रुवारी (सोमवार) रोजी आगरतळामध्ये सरस्वती पूजा साजरी केली जाईल, ज्यामुळे बँका बंद राहतील. हा दिवस ज्ञानाची देवी सरस्वती यांच्या पूजेकरिता राखून ठेवला जातो. त्याचप्रमाणे, 11 फेब्रुवारी (मंगळवार) रोजी चेन्नईमध्ये थाई पूसम हा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक सण साजरा केला जाईल, आणि त्या दिवशी येथील बँका बंद असतील. दक्षिण भारतातील या सणाला मोठे धार्मिक महत्त्व आहे
फेब्रुवारीमधील सु्ट्ट्यांची यादी खालीलप्रमाणे Holidays in February 2025
3 फेब्रुवारी (सोमवार) : सरस्वती पूजनाच्या निमित्तानं अगरताळामध्ये बँक बंद राहील.
11 फेब्रुवारी (मंगळवार) : थाई पूसामच्या निमित्तानं चेन्नईत बँका बंद असतील.
12 फेब्रुवारी(बुधवार) : श्री रविदास जयंती निमित्तानं शिमला येथे बँका बंद असतील.
15 फेब्रुवारी (शनिवार) : लुई-नगाई-नी निमित्तानं इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल.
19 फेब्रुवारी (बुधवार) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेलापूर, मुंबई, नागपूरमध्ये बँकांना सुट्टी राहील.
20 फेब्रुवारी (गुरुवार) : अरुणाचल प्रदेश, मिझोरम राज्य स्थापना दिनानिमित्त ऐझवाल, इटानगरमध्ये बँका बंद असतील.
26 फेब्रुवारी (बुधवार ): महाशिवरात्रीनिमित्त अहमदाबाद, ऐझवाल, बंगळुरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम मध्ये बँका बंद असतील.
28 फेब्रुवारी (शुक्रवार) : लोसार निमित्त गंगटोकला बँका बंद असतील.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि राज्य दिन
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी (बुधवार) रोजी साजरी केली जाईल. या दिवशी बेलापूर, मुंबई आणि नागपूर येथील बँका सुट्टीवर असतील. महान मराठा योद्ध्याच्या जयंती निमित्त ह्या ठिकाणी बँक सेवा बंद राहतील. दुसरीकडे, 20 फेब्रुवारी (गुरुवार) रोजी राज्य दिन साजरा केला जाईल. या दिवशी ऐझॉल आणि इटानगर येथील बँकांचीही सुट्टी असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील.
महाशिवरात्री आणि लोसार पर्व
महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी विविध शहरांतील बँका बंद राहतील. अहमदाबाद, ऐझॉल, बेंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरम यामध्ये बँकांची सुट्टी असेल. लोसार पर्व 28 फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी गंगटोक येथे बँक बंद असतील. त्यानुसार, त्या दिवशी संबंधित बँका ग्राहकांना सेवा देणार नाहीत.
या महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांचा विचार करतांना काही महत्त्वाच्या तारखा लक्षात घेणं आवश्यक आहे. २ फेब्रुवारी रोजी रविवार आहे, त्यामुळे ही एक साप्ताहिक सुट्टी असेल. ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी दुसरा शनिवार आणि रविवार आहे. १६ फेब्रुवारी रोजी एक जणू नियमित रविवार असणार आहे. त्यानंतर २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार आणि रविवार सुट्टीसाठी असेल. या तारखा तुमच्या कामाच्या व्यवस्थेसाठी योग्य ठरू शकतात
यासह साप्ताहिक सुट्टीनिमित्त बँका बंद असतील
2 फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.
8 फेब्रुवारी आणि 9 फेब्रुवारीला दुसरा शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
16 फेब्रुवारीला रविवारनिमित्त साप्ताहिक सुट्टी असेल.
22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारीला चौथ्या शनिवार अन् रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल.
तर अशाप्रकारे आपण वरील लेखनात पाहिले की फेब्रुवारी महिन्यात किती शुद्ध आहेत आणि कशामुळे आहेत तर या सुट्ट्यांचे व्यवस्थित नियोजन करा आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दहावी बारावी बोर्डाच्या नोटस साठी 9322515123 या नंबरवर फोन करा किंवा प्ले स्टोअर नना फाउंडेशन ॲप डाऊनलोड करा.