WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Good news to all students विद्यार्थी नापास झाला तरी पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Good news to all students आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिलासा आणि मोठ्या आनंदाची बातमी समोर येत आहे ती कुठली आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे हेच आपण पाहणार आहोत

Good news to all students पूर्ण माहिती

राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे त्यांच्या परीक्षा संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जर एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तरी त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे सरकारने शासनाने हा तातडीने निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे सर्वच विद्यार्थी पालक वर्गातून सरकारचे स्वागत करण्यात येत आहे

या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता इंजिनियरिंगमध्ये नापास झाल्यावरही तुम्हाला पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. अंभियांत्रिकीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. दहावीच्या वर्गात नापास झालेल्या उमेदवारांना ऐटीकेटीच्या माध्यमातून अकारावीला प्रवेश मिळतो. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार आहे.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबतची मागणी विद्यार्थी / विद्यार्थी संघटना / सिनेट सदस्य / लोकप्रतिनिधी यांचेकडून करण्यात आली आहे.

इंजिनियरिंगचे शिक्षण घेताना जर एखादा विद्यार्थी पा वर्षात काही विषयात नापासा झाला तर त्याला तिस वर्षाला प्रवेश मिळत नाही. तीनपेक्षा जास्त विषयांमध्ये विद्यार्थी नापास नसावा, अशी अट आहे. तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाचे सर्व विषय क्लिअर असावे लागतात. अंतिम वर्षात प्रवेश घेण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षात नापास झालेल्या विषयात पास होणे गरजेचे आहे. परंतु आता या निर्णयात काही बदल करण्यात आला आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑन सुविधा लागू

तंत्र शिक्षण संचालक यांनी कळविल्याप्रमाणे राज्यातील काही विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता अभियांत्रिकी अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तर काही विद्यापीठांनी अशी सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. तथापि, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांशी संबंधित विद्यार्थ्यांना कॅरी ऑन सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये एकसमानता आणण्यासाठी अशा सर्व अकृषी विद्यापीठांना त्याबाबत निर्देश देण्याबाबत शासन स्थरावर विचार केला जात होता.

शासनाचा निर्णय काय?

राज्यातील सार्वजनिक विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (रायगड) यांच्यासाठी हा आदेश लागू होणार आहे.

पहिल्या वर्षात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या सत्रात आणि द्वितीय वर्षातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सातव्या सत्रात प्रवेश मिळणार आहे.

पुढच्या वर्गात प्रवेश देण्याची पात्रता २०२४-२५ म्हणजे हिवाळी परीक्षेच्या निकालावर ठरवावी.

पुढच्या वर्गात प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना विषम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. यासाठी महाविद्यालयाकडे हमीपत्र द्यावे लागेल.

ज्या विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता carry on ची सुविधा त्यांच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच दिली असेल, अशा विद्यापीठांना सदर निर्देश लागू असणार नाहीत.सदर निर्देश अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये केवळ शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता लागू राहतील व या निर्देशांचा संदर्भ पुढील वर्षामध्ये घेता येणार नाही, असे अध्यादेशात नमूद केले आहे.

अशाप्रकारे आपण पाहिलं की कोणत्या विद्यार्थ्यांना नापास झाले तरी पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रूप जॉईन करा दहावी बारवी बोर्डाच्या नोट्स साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment