Girls Scholership आज आपण पाहणार की मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या पाच सरकारी स्कॉलरशिप आहेत अर्थातच शिष्यवृत्ती आहेत यांचे नाव व त्यासाठीच कोणत्या विद्यार्थ्यांनी मिळतील कागदपत्र काय लागतील वयाची अट काय असेल पात्रता काय असेल याविषयी आपण सर्व माहिती घेणार आहोत
Girls Scholership संपूर्ण माहिती
राज्यातील मुलींसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी समोर येते तुमच्या घरात जर मुलगी असेल आणि ती शिक्षण करत असेल तर तुम्हाला तिच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे याचा आर्थिक बहुजा वाटत असेल तर तुम्हाला आज आपण माहिती घेणार आहोत की पाच अशा काही स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करून तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी सरकारकडून पैसे घेऊ शकतात त्यामुळे तुमच्या मुलीचे शिक्षणासाठी लागणारे जो पैसा आहे त्याच्यामध्ये थोडीफार मदत होऊ शकते तर बघूयात की आज स्कॉलरशिप कोणत्या कोणत्या आहेत आणि यासाठी आपल्याला काय करावे लागेल
Girls Scholership मुलींना उत्तम शिक्षण मिळावे. त्यांना स्वतः च्या पायावर उभं राहता यावे, यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. शिक्षणाचा खर्च अनेकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकजण मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच मुलींच्या शिक्षणासाठी अनेक स्कॉलरशिप सुरु करण्यात आल्या आहे. या योजनांमध्ये मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.
1. उडान स्कॉलरशिप ( CBSE UDAAN Scholarship)
सीबीएसई अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. जेणेकरुन त्यांना इंजिनियरिंगच्या तयारीसाठी आर्थिक मदत मिळेल. मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये अॅडमिशन घेता यावे. यासाठी मदत केली जाते. या स्कॉलरशिपमध्ये राखीव प्रवर्गातील मुलींना जागा राखीव असतात.
2. बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप (Begam Hazrat Mahal National Scholarship)
बेगम हजरत महल नॅशनल स्कॉलरशिप नववी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना दिली जाते. ही स्कॉलरशिप मुस्लिम, ख्रिश्चन, सिख,बौद्ध, जैन आणि पारसी समाजातील विद्यार्थिनींना मेरिट लिस्टद्वारे दिली जाते.
3. प्रगती स्कॉलरशिप (Pragati Scholarship)
प्रगती स्कॉलरशिप अशा मुलींना दिली जाते. त्यांनी AICTE मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये डिग्री किंवा डिप्लोमासाठी अॅडमिशन घेतले असेल. यासाठी मुलींच्या कुटु्ंबाचे उत्पन्न ८ लाखांचे कमी असावे.
4. इंदिरा गांधी स्कॉलरशिप (Indira Gandhi Scholarship)
इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल चाइल्ड ही त्या मुलींना दिली जाते ज्या एकुलत्या एक असतील. त्यांनी कोणत्याही नॉन प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये अॅडमिशन घेतले असेल.
5. सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप (Savitribai Phule Scholarship)
ही योजना खास महाराष्ट्रातील मुलींसाठी राबवण्यात आली आहे.मागासवर्गीय मुलींना ही स्कॉलरशिप दिली जाते. यामध्ये आठवी ते १०वीच्या विद्यार्थींनीचा समावेश आहे. त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी ही स्कॉलरशिप सुरु करण्यात आली आहे.
आपण पाहिलं की मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या स्कॉलरशिप योजना आहे त्याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट सरी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन आहे प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा