Gas cylinder today price आज आपण पाहणार आहोत की राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे गॅस सिलेंडर आता हा या नागरिकांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कोणत्या नागरिकांना मिळणार कशामुळे मिळणार आहे या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज या लेखनात पाहणार आहोत
Gas cylinder today price संपूर्ण माहिती
देशभरातील गॅस सिलेंडरच्या किमती अचानक वाढल्याने ग्राहकांना याचा मोठा फटका बसलेला आहे यातच तुम्हाला माहिती आहे का या नागरिकांना आता फक्त पाचशे रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे त्यामुळे एक आनंदच वातावरण आहे कोणत्या ग्राहकांना मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत गॅस सिलेंडर हा एक प्रत्येकाचा अभिपडच्या घटक आहे प्रत्येक कुटुंबामध्ये गॅस सिलेंडरचा उपयोग केला जातो छोटा व्यापारी असेल त्याचप्रमाणे कुटुंब धारक असेल मोठा व्यवहारी असेल आपल्या उद्योगांमध्ये गॅस सिलेंडरचा वापर करून ते वेगवेगळे क्षेत्राचा योग्यरित्या वापर केला जातो म्हणून याच्या प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किमती कमी जास्त होत असतात परंतु सध्या महाग या महिन्यामध्ये जवळपास गॅस सिलेंडरच्या किमती 50 रुपयांनी महाग झालेले आहेत त्यातच आता फक्त पाचशे रुपयांनी गॅस मिळणार आहे कुणाला मिळणार आहेत बघूयात संपूर्ण माहिती
Gas cylinder today price नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला. सोमवारी केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडर अर्थातच घरगुती
गॅस सिलेंडरच्या किमती बदलल्यात.
सोमवारी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 50 रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक मोठा धक्का बसलाय. महत्त्वाचे म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील वाढवल्या गेल्या आहे
सामान्य ग्राहकांना तसेच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना देखील या दरवाढीचा फटका बसणार आहे. यामुळे सर्वसामान्य गरीब महिलांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आठ एप्रिल 2025 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या असून ज्यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना एक मोठा फटका बसला आहे.
मात्र असे असले तरी देशातील काही ग्राहकांना गॅस सिलेंडर अजूनही 303 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण शासनाच्या या दरवाढीनंतरही कोणत्या ग्राहकांना एलपीजी गॅस सिलेंडर 300 रुपयांनी स्वस्त मिळणार? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या ग्राहकांना 300 रुपयांनी स्वस्त मिळणार एलपीजी गॅस सिलेंडर
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 50 रुपयांनी महाग झाल्या आहेत. या दरवाढीनंतर सामान्य ग्राहकांना राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 853 रुपयांना मिळणार आहे. मात्र उज्वला योजनेचा लाभार्थ्यांना घरगुती गॅस सिलेंडर फक्त 553 रुपयांना मिळणार आहे.
आधी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे गॅस सिलेंडर फक्त 503 रुपयांना मिळत होते. मात्र आता हे सिलेंडर 553 रुपयांना मिळणार आहे पण असे असेल तरी सामान्य ग्राहकांच्या तुलनेत या ग्राहकांना अजूनही गॅस सिलेंडर 303 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. अर्थातच उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 303 रुपयांची सबसिडी मिळणार आहे.
किती महिन्यांनी बदलल्यात गॅस सिलेंडरच्या किमती?
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती जवळपास एका वर्षांनी बदलल्या आहेत. याआधी मार्च 2024 मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती चेंज झाल्या होत्या. मार्च 2024 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठी भेट देत गॅस सिलेंडरच्या किमती शंभर रुपयांनी कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर मात्र अनेक दिवस गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर राहिल्यात.
गॅस सिलेंडरच्या किमती वाढण्याचे कारण काय?
आता आपण गॅस सिलेंडरच्या किमती वाढण्याचे कारण नेमके काय आहे? याबाबत सरकारने काय स्पष्टीकरण दिले आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीतील एलपीजीची किंमत प्रति सिलेंडर 1,028.50 रुपये हवी होती.
परंतु सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम विपणन कंपन्या आतापर्यंत किंमतींवर नियंत्रण ठेवून होत्या. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी कमी किंमतीत गॅस विक्री केल्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये त्यांना 41,388 कोटी रुपये तोटा झाला आहे
आता त्यांची वाढती तूट पाहता कंपन्यांनी गॅस सिलेंडरची किंमत थोडीशी वाढवली आहे. दरम्यान यापुढे दरमहा LPG किंमतींचा आढावा घेण्यात येईल आणि आगामी काळात एलपीजीच्या किंमतीं कमी ठेवण्यासाठी सरकारकडून आवश्यक तो निर्णय घेतला जाईल.
पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, प्रति सिलेंडर 50 रुपयांची वाढ केवळ भविष्यातील खर्चाची पूर्तता करेल आणि मागील खर्चासाठी पेट्रोलियम मंत्रालय वित्त मंत्रालयाकडून अर्थसंकल्पीय मदत उपलब्ध करून देणार आहे.
अशाप्रकारे आपण पहिला की गॅस सिलेंडर कोणत्या नागरिकांना पाचशे रुपये मिळणारे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा