Farmer ID Card online process आज आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकऱ्यांना लागणारे फार्मर आयडी कार्ड आता हे तुम्हाला घरी बसल्या देखील बनवता येईल याची पूर्ण माहिती आपण या लेखनात घेणार आहोत
Farmer ID Card online process पूर्ण माहिती
देशभरातील शेतकऱ्यांसाठी आता डिजिटल करण करण्यात आलेला आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड देण्यात येणार आहे या फार्मर आयडी कार्डचा वापर करून आता शेतकरी प्रत्येक योजनेचा सरकारी योजनेचा लाभ सहजरीत्या मिळू शकतात त्यामुळे आता हे फार्मर आयडी कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं अत्यंत गरजेचे आहे या आयडी कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही याचं गरज लागणार नाहीये
Farmer ID Card online process भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणात एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केंद्र सरकारने डिजिटल कृषी मिशन अंतर्गत शेतकरी ओळखपत्र योजना सुरू केली आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देऊन त्यांना विविध सरकारी योजनांचा थेट लाभ पोहोचवणे हे आहे. या लेखात आपण या महत्त्वाकांक्षी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
शेतकरी ओळखपत्र हे एक विशेष डिजिटल दस्तऐवज आहे, जे शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडलेले असते. हे ओळखपत्र राज्यांच्या भूमी अभिलेख विभागाशी थेट संलग्न असल्यामुळे, जमिनीच्या नोंदीमध्ये होणारे कोणतेही बदल स्वयंचलितपणे अद्ययावत होतात. सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये ही योजना कार्यान्वित आहे
या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत:
वित्तीय सुविधांचा सुलभ प्रवेश:
कृषी कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सुलभ होईल
बँकेला वारंवार भेट देण्याची आवश्यकता नाही
कागदपत्रांची पूर्तता करण्याचे श्रम वाचतील
शेती उत्पादन व्यवस्थापन:
दर्जेदार बियाणे, खते आणि कृषी उपकरणांची उपलब्धता
माती परीक्षण आणि पीक सल्ला सेवा
बाजारभावाची अद्ययावत माहिती
सरकारी योजनांचा थेट लाभ:
विविध कृषी योजनांचा लाभ थेट बँक खात्यात
सबसिडी वितरणात पारदर्शकता
योजनांच्या लाभासाठी पुन्हा पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही
फार्मर आयडी कार्ड चा उपयोग
शेतकऱ्यांनी जर फार्मर आयडी कार्ड बनवला तर त्यांना कुठल्याही प्रकारची ज्या सरकारी योजना येतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या कागदपत्रांची काही आवश्यकता असते त्यामुळे आता फार्मर आयडी कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तोच मोठा पुरावा तुमच्यासाठी होणार आहे आणि नक्कीच एक डिजिटल क्रांती झाली आहे असे म्हणावे लागेल
ओळखपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
आधार-लिंक मोबाईल नंबर
कुटुंब ओळखपत्र किंवा रेशन कार्ड
जमिनीचा 7/12 उतारा
ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया:
प्रारंभिक नोंदणी:
अधिकृत वेबसाइट (mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/) वर जा
नवीन खाते तयार करा
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा
वैयक्तिक माहिती भरणे:
व्यक्तिगत तपशील इंग्रजी आणि मराठीत भरा
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सत्यापित करा
सुरक्षित पासवर्ड तयार करा
जमीन तपशील नोंदणी:
जिल्हा, तालुका, गाव निवडा
सर्वे नंबर (7/12 उतारा) प्रविष्ट करा
जमीन मालकी हक्क सत्यापित करा
अंतिम सत्यापन:
सोशल रजिस्ट्री तपशील भरा
ई-साइन प्रक्रिया पूर्ण करा
नोंदणी क्रमांक प्राप्त करा
अशाप्रकारे आपण पाहिलं की फार्मर आयडी कार्ड हे आपण घरबसल्या कसे काढू शकतो याची माहिती घेतली आमच्या सर्व लेटेस्ट शब्द साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा किंवा दहावी बरावी बोर्डाच्या नोट साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा अथवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा