Exam result marks आज आपण पाहणार आहोत की राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आपल्याला निकाल आधीच आपले मार्क करणार आहेत खरच खूपच हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे शिक्षण विभागणी यामुळे विद्यार्थ्यांना कसं फायदा होणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत आणि निकाल आधी आपल्याला मार्ग कसे कळतील तर बघुयात संपूर्ण माहिती.
Exam result marks पूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षा देतात त्यावेळेस ते निकालाची प्रतीक्षा करतात निकाल लागल्यानंतर विद्यार्थी परीक्षेत नापास होतात कमी मार्क पडतात मग त्यानंतर विद्यार्थी याची फेर तपासणी करतात जसे की रिचेकिंग चा फॉर्म भरणे फोटोकॉपी मागवणे रियालुशन चा फॉर्म भरणे यामध्ये बरेच प्रोसेस होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुढचा शैक्षणिक नुकसान पण होण्याचे भरपूर शक्यता असते त्यामुळे आता शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे निकालाच्या आधीच विद्यार्थ्यांना त्याचे गुण माहित पडणार आहेत त्यामुळे जर त्याला कमी गुण वाटले कुठल्या विषयात तर तो ही सर्व प्रोसेस आधीच करू शकेल आणि त्याच्यामुळे त्याचा पुढचा शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे खरंच हा एक चांगला निर्णय आहे आणि येत नाही कशाप्रकारे आणि कसा लागू होणार हे तर बघुयात संपूर्ण माहिती.
Exam result marks परीक्षेच्या निकालानंतर कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांना १५ दिवसांत उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना एक-दोन हजार रुपये शुल्क मोजावे लागते. या पार्श्वभूमीवर आता निकाल अंतिम करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना (पहिल्या टप्प्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी) ई-मेलवर प्रत्येक विषयाचे गुण कळवून त्यांचे आक्षेप घेतले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याचे ऐतिहासिक नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने केले आहे.
एकाच जिल्ह्यासाठी विद्यापीठ, अशी ओळख असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आता २० वर्षांचे झाले आहे. नुसत्या पदव्या देऊन सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असल्याने विद्यापीठाने तब्बल १५० कौशल्य विकास प्रशिक्षण कोर्स सुरू केले आहेत. आता पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल आता कमी झाला आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांनी त्यांच्याकडील अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता वाढवून मिळावी, असे अर्ज विद्यापीठाकडे केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी परीक्षा विभाग अधिक सुधारावा, विद्यार्थ्यांची परीक्षा पारदर्शक व्हावी, निकालातील त्रुटी दूर कायमच्या व्हाव्यात, अशा बाबींवर विशेष फोकस केला आहे.
विद्यापीठाकडून नियोजन सुरू
विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेवेळी आता विद्यापीठाचे बहिःस्थ परीक्षक उपस्थित राहतील. दरम्यान, मागची सत्र परीक्षा संपल्यावर लगेचच सर्व महाविद्यालयांनी अध्यापनास सुरवात करावी, असे पत्र प्राचार्यांना दिले होते. त्यानुसार एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या वर्षी निकालातील त्रुटी दूर करण्यासाठी कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली निकालापूर्वी विद्यार्थ्यांना विषयांचे गुण दाखवून निकाल अंतिम करण्याचे नियोजन आहे.
– डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
अशी असणार निकालाची नवी पद्धत
परीक्षेचा अर्ज भरून घेताना विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी घेतला जाईल. परीक्षा झाल्यावर ज्यावेळी उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होऊन विद्यापीठाकडे निकाल प्राप्त होतील, त्यावेळी ते प्रत्येक विषयाचे गुण एकत्रितपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेलवर पाठविले जातील. सुरवातीला पहिल्या टप्प्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रयोग करण्याचे नियोजन आहे. विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास ते विद्यापीठाच्या ई-मेलवर आक्षेप नोंदवतील. ठरावीक दिवसांच्या मुदतीनंतर त्या आक्षेपांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचा निकाल अंतिम केला जाईल. जेणेकरून निकालातील त्रुटी दूर होतील, असा विद्यापीठ प्रशासनाला विश्वास आहे.
अशाप्रकारे आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना निकालाच्या आधीच तसे गुण माहित पडणार आहेत याची माहिती आपण घेतली आहे आमच्या सर्व लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप अथवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा
This is so beautiful
That is so good