Driving licence apply आज आपण पाहणार की आपल्याला घरबसल्या मोबाईलवर ड्रायव्हिंग लायसन कसे करावे लागेल यासाठी कोणते कागदपत्र लागतील आणि आपल्याला अर्ज कसा करावा लागेल बाकी काय आहेत कारण ड्रायव्हिंग लायसन हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी पाहू संपूर्ण माहिती
Driving licence apply संपूर्ण माहिती
राज्यातील वाहनधारकांसाठी नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे तुम्ही आत्यात देखील लायसन काढलं नसेल आणि तुम्हाला नवीन माहिती वाहन घ्यायचा असेल तर आपल्याला लायसन हे गरजेचं असतं कारण लायसन्स शिवाय आपण कुठल्याही वाहन चालू शकत नाही लायसन कसं करायचं हा बराच प्रश्न आहे त्यासाठी एजंटकडे आपण जातो त्याला पैसे देतात तोपर्यंत तुम्ही आता घरी बसल्या देखील लायसन काढू शकता पूर्ण माहिती आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप घेऊयात सगळी माहिती
Driving licence apply ड्रायव्हिंग लायसन्स (DL) हा भारतात कोणत्याही वाहनचालकासाठी अत्यावश्यक दस्तऐवज आहे. लर्निंग लायसन्स नसताना वाहन चालवणे म्हणजे सरळसरळ वाहतूक नियमांचे उल्लंघन आहे. यामुळे वारंवार दंड (चालान) भरावा लागू शकतो. अनेकदा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाऊन टेस्ट देण्याच्या प्रक्रियेतील अडचणी आणि लांबलचक रांगांमुळे अनेकजण लर्निंग लायसन्स काढणे टाळतात. पण आता ही प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे.
आता RTO मध्ये रांगेत उभारून नाही, घरबसल्या द्या टेस्ट
पूर्वी लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO कार्यालयात जाऊन, रांगेत तासंतास थांबून टेस्ट द्यावी लागत असे. पण आता हीच टेस्ट आपण घरबसल्या ऑनलाईन देऊ शकतो. सरकारच्या परिवहन सेवा (Parivahan Sewa) पोर्टलमुळे हे शक्य झाले आहे. फक्त काही मिनिटांत तुम्ही ऑनलाइन टेस्ट पूर्ण करून लर्निंग लायसन्स मिळवू शकता.
ऑनलाईन लर्निंग लायसन्ससाठी अर्ज कसा कराल?
Parivahan Sewa या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘Apply for Learner Licence’ किंवा ‘Online Test/Appointment’ पर्यायावर क्लिक करा.
आपले राज्य निवडा.
‘Sarthi Parivahan’ पोर्टलवर तुम्हाला विविध पर्याय दिसतील – त्यात ‘Apply for Learner Licence’ निवडा.
अर्ज भरताना आधार कार्ड, पत्ता पुरावा, पासपोर्ट साईज फोटो अशा कागदपत्रांची आवश्यकता असेल.
सर्व स्टेप्स फॉलो करून अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक नोंदवून ठेवा.
ऑनलाईन टेस्ट कशी द्याल?
पुन्हा सारथी पोर्टलवर जा आणि ‘Online LL Test (STALL)’ या पर्यायावर क्लिक करा.
अर्ज क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा.
आता तुम्ही थेट ऑनलाइन टेस्ट देऊ शकता.
महत्त्वाचे
टेस्ट देण्यापूर्वी ‘Tutorial for LL Test’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण मार्गदर्शक व्हिडीओ पाहू शकता. हे पाहिल्यावरच टेस्ट सुरू करता येईल. ही ऑनलाइन टेस्ट सेवा सध्या काही राज्यांपुरती मर्यादित आहे. तुमच्या राज्यात सेवा उपलब्ध नसेल, तर फक्त ऑनलाइन अर्ज करून RTO मध्ये टेस्टसाठी स्लॉट बुक करावा लागेल. त्यामुळे लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता RTO मध्ये तासंतास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. फक्त काही मिनिटांत, घरबसल्या ऑनलाईन टेस्ट देऊन तुम्ही अधिकृत लायसन्स मिळवू शकता. वेळ, श्रम आणि अनावश्यक त्रास वाचवणारी ही सुविधा नक्की वापरून पाहा
अशाप्रकारे आपण पाहिलं की घरबसल्या आपल्या लायसन कसे करता येईल याची माहिती आपण घेतले आहे आमचे लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा