WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dr panjabrav scholarship मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 1लाख मिळणार सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dr panjabrav scholarship आज आपण पाहणार आहोत की राज्यातील मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सरकारकडून आता पैसे मिळणार आहेत हे पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय असेल त्याचप्रमाणे पात्रता निकष शिक्षणाचे अट काय असेल या सर्वांची माहिती आपण आज या लेखनात घेणार आहोत.

Dr panjabrav scholarship संपूर्ण माहिती

राज्यातील मराठा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरीत आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे मराठा विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी आर्थिक भत्ता सवलत आणि त्याचप्रमाणे पैसे मिळणार आहे आता हे पैसे आर्थिक भरता मिळवण्यासाठी शिक्षण आपले पूर्ण करण्यासाठी त्यांना काय करावे लागणार आहे याचीच माहिती आपण आज घेणार आहोत मराठा विद्यार्थ्यांना वेळोवेळी शिष्यवृत्ती आरक्षणासाठी मागण्या केल्या जात होत्या त्याचं मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या मागणीची दखल घेत तंत्रशिक्षण संचालनालयाने आता शिष्यवृत्ती व वसतिगृह निर्वाह भत्ता योजनांकरिता एसईबीसी विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे मराठा व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या डीबीटी पोर्टलवर तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना’ व ‘डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना’ राबविण्यात येतात. एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही या योजना लागू करण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. त्यानंतर शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय घेतला. त्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतर सोमवारी संचालनालयाने याबाबतची सूचना प्रसिद्ध करीत मराठा व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना अर्जाचे आवाहन केले.

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वये २०२४
-२५ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सर्व संस्थांनी सदर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्याबाबत माहिती देऊन पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घ्यावेत, अशी सूचनाही दिली आहे.

पंधरा दिवसांनी आढावा
योजनेच्या लाभासाठी अर्ज भरताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागीय कार्यालयांनी विशेष मोहीम राबवून त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व संस्थांसोबत बैठक घेऊन योजनांच्या प्रगतीचा आढावा दर पंधरा दिवसांनी घ्यावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
तातडीने अर्ज निकाली निघणार

ज्या विद्यार्थ्यांनी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड केले असेल, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित न ठेवता संबंधित योजनेच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार काटेकोरपणे तपासणी करून निकाली काढावेत, असे आदेशात म्हटले आहेत.

या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार
पोर्टलवर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड केले नसेल, तर अशा विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र अपलोड करून मुदतीत अर्ज भरावा लागेल.

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलत निर्वाह भत्ता कसा मिळणार आहे याची माहिती आपण पाहिली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी व्हाट्सअप वर टेलीग्राम ग्रुप जॉईन करा पहिले ते दहावी ऑनलाईन क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

1 thought on “Dr panjabrav scholarship मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 1लाख मिळणार सरकारचा मोठा निर्णय”

  1. माल शिक्षणा साठी सरकार कडून पैसे पाहिजेत
    माझे वाडील पण नाहीत अणि मि मराठा आहे

    Reply

Leave a Comment